ग्रामीणच्या तुलनेत शहरात मतदान माघारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:33 AM2020-12-04T04:33:04+5:302020-12-04T04:33:04+5:30
अमरावती : जिल्ह्याच्या तुलनेत ५० टक्क्यांवर मतदारसंख्या याशिवाय उमेदवारांची अधिक संख्या असलेले अमरावती शहर विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदानात माघारले आहे. ...
अमरावती : जिल्ह्याच्या तुलनेत ५० टक्क्यांवर मतदारसंख्या याशिवाय उमेदवारांची अधिक संख्या असलेले अमरावती शहर विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदानात माघारले आहे. अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्रांवरील घिसाड नियोजनाचा फटका मतदानाला बसला. रांगेत दोन ते तीन तास थांबल्यानंतरही प्रतीक्षा करावी लागत असल्याने काही मतदार मतदान न करताच घरी परतल्याचे वास्तव आहे.
विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघासाठी अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक १०,३८६ मतदार व सर्वाधिक २५ मतदान केंद्र होते. त्यामुळे अमरावती शहरातील ९ व ग्रामीणमधील १ अशा एकूण १० मतदान केंद्रांवर सर्वधिक मतदान होईल, अशी अपेक्षा उमेदवारांची होती. मात्र, या १० केंद्रांवरील ५,४८३ मतदारसंख्येच्या तुलनेत ४,३०० मतदान झाले. सर्वात कमी ७१ व सर्वाधिक ८४ असे मतदान झाले आहे.
जिल्ह्यात धारणी तालुक्यात २५० मतदान झाले, ही टक्केवारी ८५.९१ इतकी आहे, चिखलदरा ८६ मतदान ८४.३१ टक्के, दर्यापूर ४६६ मतदान ८८.२६ टक्के, अंजनगाव सुर्जी ५०१ मतदान ९२.६१ टक्के, अचलपूर ९४३ मतदान ८४.२५, टक्के, चांदूर बाजार ३९२ मतदान ८९.७० टक्के, मोर्शी २७८ मतदान ८५.८० टक्के, वरूड ६५७ मतदान ९२.२४ टक्के, तिवसा ११८ मतदान ८५.७१ टक्के, नांदगाव खंडेश्वर १२३ मतदान ९१.११ टक्के, चांदूर रेल्वे १७८ मतदान ८९.४५ टक्के व दामणगाव तालुक्यात २७८ मतदान झाले, ही टक्केवारी ९२.०५ आहे.
बॉक्स
घिसाड नियोजन, मतदार परतले
शहरातील दोन केंद्रांवर अनुक्रमे ८५१ व ९३५ मतदारसंख्या होती. यावेळी प्रत्येक उमेदवारास तीन ते पाच मिनिटे वेळ मतदानास लागत असल्याने मतदानाची गती मंदावली, त्यातुलनेत मतदान करणाऱ्यांची संख्या वाढल्याने केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या. दोन तासानंतरही प्रतीक्षा करावी लागत असल्याने काही मतदार दुपारनंतर मतदान करू, या उद्देशाने परतले. मात्र, परत आल्यानंतर यापेक्षाही बिकट स्थिती असल्याने काहींनी मतदान करायचे टाळले असल्याचे सांगण्यात आले.