बेलोरा विमानतळाचा वळण मार्ग निर्माण होणार

By admin | Published: April 2, 2015 11:56 PM2015-04-02T23:56:55+5:302015-04-02T23:56:55+5:30

बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण, सांैदर्यीकरणात खोडा ठरणारा यवतमाळ वळण मार्ग निर्मितीमधील अडचणी दूर

The turnover of the Belorora Airport will be created | बेलोरा विमानतळाचा वळण मार्ग निर्माण होणार

बेलोरा विमानतळाचा वळण मार्ग निर्माण होणार

Next

१९ कोटी रुपये प्राप्त : सार्वजनिक बांधकाम विभागावर जबाबदारी
अमरावती :
बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण, सांैदर्यीकरणात खोडा ठरणारा यवतमाळ वळण मार्ग निर्मितीमधील अडचणी दूर झाल्या आहेत. राज्य शासनाने अर्थसंकल्पात त्याकरीता १९ कोटी रुपयांची तरतूद केल्याने हा वळण मार्ग लवकरच निर्माण होणार आहे. जळू ते बेलोरा या दरम्यान ३.८० किलोमिटर रस्ता निर्मितीची निविदा प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम विभाग राबविणार आहे.
महाराष्ट्र विमानतळ कंपनीला बेलोरा विमानतळावर धावपट्टी, रस्ते निर्मिती, विद्युतीकरण, पाणी पुरवठा आदी महत्त्वाची कामे पूर्ण करुन हे विमानतळ एयरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाला द्यावे लागणार आहे. बेलोरा विमानतळावरुन प्रवासी विमाने सुरु करण्याचा मानस शासनाचा आहे. मात्र, बेलोरा विमानतळवर पायाभूत सुविधा असल्याशिवाय प्रवासी विमाने कशी सुरु करावी, हा प्रश्न निर्माण झाला आहे. २९ फेब्रुवारी २०१४ च्या शासन निर्णयानुसार बेलोरा विमानतळावरुन प्रवासी विमाने सुरु करण्याच्या मोबदल्यात एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया हे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला दरमहिन्याला एक लाख रुपये देणार आहे. मात्र, बेलोरा विमानतळावरुन प्रवासी विमाने सुरु करण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा पूर्ण केल्याशिवाय काहीही शक्य नाही, हे वास्तव आहे. यवतमाळ वळण मार्ग हा अकोला राष्ट्रीय महामार्गाशी जोडणे आवश्यक असून ते काम पूर्ण झाल्याशिवाय विमानतळाचे विस्तारीकरण करता येणार नाही, ही बाब बेलोरा विमानतळाच्या प्रबंधकांनी शासनाला कळविली आहे.

प्रवासी विमाने सुरू
करण्याची लगबग
बेलोरा विमानतळावरुन देशातंर्गत प्रवासी विमाने सुरु करण्याची लगबग एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाची आहे. विमानतळावर पायाभूत सुविधा पूर्ण होताच बेलोरा विमानतळ महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून ताब्यात घेतले जाणार आहे. त्याअनुषंगाने शासन निर्णय देखील पारित करण्यात आला आहे. केवळ विमानतळावर पायाभूत सोयी सुविधांची प्रतीक्षा आहे.

ना. फडणवीस, ना. गडकरींचा दौरा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय भुपृष्ठमंत्री नितीन गडकरी हे अमरावतीत १० व ११ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या कृषी मेळाव्याला विमानाने येत असल्याचा पार्श्वभूमीवर विमानतळ प्रबंधकांनी व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. धावपट्टी, विद्युत व्यवस्था, पाणी पुरवठा आदीबाबत उणीवा राहू नये, याची दक्षता घेतली आहे. अद्यापर्यंत गडकरी, फडणवीस यांचा दौरा आला नसला तरी संभावित दौरा निश्चित होईल, असे संकेत आहे.

बेलोरा विमानतळावरुन प्रवासी विमाने सुरु करण्याचे धोरण आहे. त्यानुसार शासन निर्णय असून विमानतळावर पायाभूत सोयीसुविधा निर्मितीवर भर दिल्या जात आहे. १९ कोटी रुपये प्राप्त झाल्यामुळे वळण मार्ग निर्मितीतील अडचणी दूर झाल्या आहेत. धावपट्टीची लांबी वाढविणे गरजेचे आहे.
एम.पी. पाठक
प्रबंधक, बेलोरा विमानतळ

Web Title: The turnover of the Belorora Airport will be created

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.