बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचा पेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:13 AM2021-03-07T04:13:02+5:302021-03-07T04:13:02+5:30
दहावी-बारावीच्या शालांत परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. एप्रिल महिन्याच्या शेवटी या परीक्षा होणार असून, त्यापूर्वी प्रात्यक्षिक परीक्षा घ्यावी ...
दहावी-बारावीच्या शालांत परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. एप्रिल महिन्याच्या शेवटी या परीक्षा होणार असून, त्यापूर्वी प्रात्यक्षिक परीक्षा घ्यावी लागणार आहे. मागील वर्षभरात विद्यार्थी शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जाऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून प्रात्यक्षिकांचा सराव करून घेता आलेला नाही. अशा स्थितीत अंतिम प्रात्यक्षिक परीक्षा कशा प्रकारे घ्यावी, विद्यार्थ्यांकडून यासाठी तयारी कशी करून घ्यावी, त्यांचे गुणदान कसे करायचे, अशा अडचणी शाळा-महाविद्यालयांपुढे उभ्या ठाकल्या आहेत.
बॉक्स
ऑफलाईन परीक्षा चिंतेचे कारण
शालांत परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार असल्याने शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाकाळात सुरक्षित पद्धतीने परीक्षा कशी पार पाडायची, परीक्षांचे नियोजन कसे करायचे, याबाबत शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांना नियोजन करावे लागणार आहे. परीक्षा केंद्रांवरील सुरक्षेबाबत पालक आणि विद्यार्थ्यांना ही काळजी घ्यावी लागणार आहे.