बारावी निकालाचा पेच सुटला, विद्यार्थ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:10 AM2021-07-03T04:10:05+5:302021-07-03T04:10:05+5:30

(असायमेंट) अमरावती : कोरोनामुळे शिक्षण क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. शाळा-महाविद्यालये बंद असल्याने दहावी, बारावीच्या परीक्षाही रद्द झाल्याने विद्यार्थ्यांची ...

Twelfth result was solved, students were relieved | बारावी निकालाचा पेच सुटला, विद्यार्थ्यांना दिलासा

बारावी निकालाचा पेच सुटला, विद्यार्थ्यांना दिलासा

Next

(असायमेंट)

अमरावती : कोरोनामुळे शिक्षण क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. शाळा-महाविद्यालये बंद असल्याने दहावी, बारावीच्या परीक्षाही रद्द झाल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. दहावीच्या निकालासंदर्भात निकालाचे मार्गदर्शन बोर्डाने शिक्षण विभागाला दिलेत. त्यानुसार सर्व शाळेने कार्य पूर्ण करून विद्यार्थ्यांचे गुण पाठविले. आता बारावीच्या निकालाबाबत मूल्यमापनाची पद्धती स्पष्ट झाल्याने कनिष्ठ महाविद्यालयांसह शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. आता मू्ल्यमापन होऊन निकाल लागणार आहे.

आतापर्यंत दरवर्षी बारावीच्या निकालानंतर दहावीचा निकाल जाहीर व्हायचा. मात्र, यंदा सर्व उलट होणार असल्याचे चित्र आहे. शिक्षण विभागाच्या दिरंगाईचा फटका बारावीनंतरच्या शैक्षणिक सत्राला बसणार आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे गुणदान दहावी, अकरावी आणि बारावी ३०:३०:४० सूत्राने ठरली आहे. यावर्षी बारावीचे प्रात्यक्षिकही झाले नाही. मागील वर्षी अकरावीची परीक्षा झाली नाही. त्यामुळे एकूणच विद्यार्थ्यांचे नुकसान तर होणार नाही ना? अशी भीती निर्माण झाली होती. मात्र, नव्याने सूत्राने विद्यार्थ्यांच्या डाेक्यावरील चिंतेचे मळभ दूर झाले आहे.

बॉक्स

बारावीसाठी असे होणार गुणदान

कोरोनामुळे राज्यातील इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता गुण देण्याचे सूत्र शिक्षण विभागाने निश्चित केले आहे. यासाठी १० वी, ११ वी आणि १२ वीच्या अंतर्गत परीक्षा व प्रात्यक्षिकाच्या आधारे हे गुण दिले जाणार असून यासाठी ३०: ३०: ४० असा फॉर्म्युला आहे. इयत्ता १० वीचे ३० टक्के गुण, इयत्ता ११ वीचे ३० टक्के गुण आणि इयत्ता १२ मधील अंतर्गत परीक्षा व प्रात्याक्षिक असे ४० टक्के गुण विचारात घेतले जाणार आहे.

बॉक्स

गतवर्षी अकरावीच्या परीक्षाच झाल्या नाही

१)बारावीच्या निकालाकरिता दहावी, अकरावीतील गुण ग्राह्य धरले जाणार आहे. परंतु गतवर्षी कोरोनामुळे अकरावीच्या परीक्षा झाल्याच नाहीत.

२)अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारेच विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात धक्का देण्यात आला होता. त्यामुळे आता निकाल देताना ३०:३०:४० सूत्र विचारात घतले जाणार आहे.

कोट

विद्यार्थ्यांना भविष्याची चिंता

परीक्षा झाली असती तर ज्या प्रमाणात मी अभ्यास केला, त्या प्रमाणात मला गुण मिळाले असते. आज काहीही न करणाऱ्या विद्यार्थ्यालाही चांगले गुण मिळू शकतात, तर ज्याने दिवसरात्र अभ्यास केला त्याचे नुकसानच होणार आहे. म्हणून परीक्षा व्हायला हव्यात. आज माझ्यावर अपेक्षेपेक्षा जास्त खर्च झाला असून, त्याचे सार्थक झाल्यासारखे वाटत नाही.

- नेहा रोकडे, विद्यार्थिनी.

--------------

कोविडमुळे आमच्या सर्व मेहनतीवर पाणी फेरले. कॉलेज सुरू झाले नसल्यामुळे ऑनलाइन अभ्यासक्रम आम्ही पूर्ण केला. आम्हाला आता बारावीचे गुण ३०:३०:४० सूत्राच्या आधारे देणार आहे. त्यामुळे तणाव कमी झाला असून, चिंता कमी झाली आहे. आता निकालाची प्रतीक्षा आहे.

- रितेश देशमुख, विद्यार्थी.

-------------

पॉईंटर

शाखानिहाय संख्या

विज्ञान00

कला00

व्होकेशनल000

वाणिज्य000

कोट

दहावीला मेरीट असूनही अकरावीत कमी गुण असल्यास नुकसान

बारावीतील गुणांच्या आधारे पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश पूर्वपरीक्षा घेतली जाते. दहावीचे ३० टक्के गुण, अकरावीचे ३० टक्के गुण आणि इयत्ता बारावीतील अंतर्गत परीक्षा व प्रात्यक्षिकाचे ४० टक्के गुण विचारात घ्यावे, असे सूतोवाच करण्यात आले. या वर्षात ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा पूर्णत: अभ्यास झाला नाही.

- नितीन तायडे,

बोर्डाने ३०: ३०: ४० या सूत्राचा अवलंब केल्याने चांगलेच झाले. त्यामुळे बारावीच्या निकालाचा पेच सुटला आहे. आता निकाल तयार करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयालाही अवधी द्यावा लागेल. ऑगस्टमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रवेशापासून बारावीचे विद्यार्थी वंचित राहणार नाहीत, याची काळजी घेणे महत्त्वाचे झाले आहे.

- रामकृष्ण देशमुख,

Web Title: Twelfth result was solved, students were relieved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.