एकविसावे शतक भारताचे

By admin | Published: February 28, 2017 12:20 AM2017-02-28T00:20:03+5:302017-02-28T00:20:03+5:30

आधुनिक काळ हा आव्हानाचा असून २१ व्या शतकातील आव्हानांना भारत समर्थपणे सामोरे जाऊ शकते.

Twenty-sixth Century India | एकविसावे शतक भारताचे

एकविसावे शतक भारताचे

Next

विजय भटकर : मातृभाषाही ज्ञान विज्ञानाची भाषा असावी
अमरावती : आधुनिक काळ हा आव्हानाचा असून २१ व्या शतकातील आव्हानांना भारत समर्थपणे सामोरे जाऊ शकते. त्यामुळे हे २१ वे शतक भारताचे, भारतीयांच्या कार्यकर्तृत्वाचे शतक असेल, असे त्यांनी प्रतिपादन संगणकतज्ज्ञ विजय भटकर यांनी केले.
शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावती व ओल्ड विदर्भीयन असोसिएशनचे गुणवंत विद्यार्थी व आचार्य पदवीप्राप्त विद्यार्थ्यांच्या विशेष सतकार घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जागतिक कीर्तीचे वैज्ञानिक विजय भटकर हे उपस्थित होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून ते अमरावती येथे आले होते. त्यांचे आगमन होताच राष्ट्रीय छात्र सेनेच्यावतीने मानवंदना देण्यात आली. भटकर हे विदर्भ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी सुरूवातीलाच ५६ वर्षांपूर्वी मी या महाविद्यालयाचा विद्यार्थी होतो व मला घडविण्यामध्ये या संस्थेचा मोठा वाटा आहे, असे स्पष्ट करून गत आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थी व प्राध्यापकांनी काळाची पावले ओळखून शिक्षण प्रशिक्षणात अद्ययावत असावे तसेच मातृभाषा ही ज्ञान विज्ञानाची भाषा असावी. मातृभाषेत विज्ञानाचे शिक्षण घेता यावे, यासाठी अभ्यासक, संशोधक, भाषा तज्ञांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. भारत ही आध्यात्माची भूमी तसेच विज्ञानाची भूमि म्हणून प्राचिन काळापासून ओळखली जाते. सांगीतले. तसेच गुणवंत विद्यार्थी आचार्य पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेला नॅकचे ‘अ’नामांकन व अमरावती परीक्षेत्रात सर्वोच्च गुण प्राप्त केल्याबद्दल संस्थेचे संचालक संगीता यावले यांनी प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या शैक्षणिक एकूण प्रगतीला चालणा देणारा हा उपक्रम होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुर्णिमा दिवसे, वर्षा झाडे यांनी तर आभार प्रदर्शन कल्पना कोळाळे यांनी केले.

Web Title: Twenty-sixth Century India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.