योग दिनानिमित्त शाळांमध्ये किलबिलाट
By admin | Published: June 21, 2015 12:24 AM2015-06-21T00:24:00+5:302015-06-21T00:24:00+5:30
जिल्ह्यातील शाळांना सध्या उन्हाळ्याच्या सुट्या असल्या तरी २१ जून रविवार रोजी ‘योग दिना’निमित्त पाच दिवस आधीच शाळा फुलणार आहेत.
उत्साह आणि प्रतिसाद : सुटीच्या कालावधीतही जिल्ह्यातील शाळांमध्ये योगसाधना
अमरावती : जिल्ह्यातील शाळांना सध्या उन्हाळ्याच्या सुट्या असल्या तरी २१ जून रविवार रोजी ‘योग दिना’निमित्त पाच दिवस आधीच शाळा फुलणार आहेत. विद्यार्थी शिक्षक, पदाधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी योगासने करण्यासाठी शाळेत उपस्थित राहतील. हा विशेष दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्याचा विश्वास जि.प. शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे. हिंदू, शिख, ख्रिश्चन समूहासोबतच अल्पसंख्यक समाजातही योग दिनानिमित्त सकारात्मक वातावरण दिसत आहे.
अशी आहे कार्यक्रमाची रुपरेषा
प्रार्थना, शिथिलीकरण अभ्यास, ग्रीवा चालन, कटी संचालन, गुडघा संचालन. उभे राहून केली जाणारी आसने जसे ताडासन, वृक्षासन, पाद-हस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, बैठे योगासने, भद्रासन, अर्धउष्ट्रासन, शंशाकासन, वक्रासन, पोटाच्या भारावरील आसनांमध्ये भुजंगासन, सलभासन, मकरासन, पाठीच्या भारावरील आसने, सेतुबंधासन, पवनमुक्तासन, शवासन, कपालभारती क्रीडा आदींचा समावेश आहे.