जुळे भाऊ-बहीण प्रावीण्य श्रेणीत...

By admin | Published: June 14, 2017 12:06 AM2017-06-14T00:06:00+5:302017-06-14T00:06:00+5:30

दहावीचा विद्यार्थी घरी असला की, त्याच्या अभ्यासापासून साऱ्याच गोष्टींची चांगली तयारी सुरू असते.

Twin brother-sister proficiency category ... | जुळे भाऊ-बहीण प्रावीण्य श्रेणीत...

जुळे भाऊ-बहीण प्रावीण्य श्रेणीत...

Next

जुळे भाऊ-बहीण प्रावीण्य श्रेणीत... दहावीचा विद्यार्थी घरी असला की, त्याच्या अभ्यासापासून साऱ्याच गोष्टींची चांगली तयारी सुरू असते. जर घरात एकाचवेळी दोन मुले दहावीची परीक्षा देणार असतील तर घरात किती गंभीर वातावरण असेल याची कल्पना तुम्हालाही असेलच. अन् परीक्षा दिल्यावर दोघांनाही प्रावीण्य श्रेणी मिळाल्यास आनंद साजरा होणारच! याचाच प्रत्यय धामणगावात आला. दहावीच्या परीक्षेत स्थानिक भागचंद नगर येथील आदेश रॉय यांचे जुळे अपत्य मंदिरा हिला ४७० (९४ टक्के) व अनूप ४५६ (९२ टक्के ) गुण मिळाले. दोघेही सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूलचे विध्यार्थी आहेत. दोघांचा जन्म एकाच दिवशी २१ नोव्हेंबरला झाला.

Web Title: Twin brother-sister proficiency category ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.