कोतवालास मारहाण करणाऱ्या दोन आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:10 AM2021-06-05T04:10:36+5:302021-06-05T04:10:36+5:30
धामणगाव रेल्वे : रेतीच्या वादावरून एका कोतवालाला मारहाण करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. तालुक्यातील मंगरूळ ...
धामणगाव रेल्वे : रेतीच्या वादावरून एका कोतवालाला मारहाण करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली.
तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथील नितीन दिवाकर पडघान (२९) या कोतवालास चंद्रभागाबाई पाकोळे विद्यालयासमोर जात असताना दोघांनी अडवून रेतीच्या वादावरून मारहाण केली. हे दोन्ही आरोपी १५ दिवसांपासून फरार होते. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने या दोन्ही आरोपींना वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथून अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय गराड, मंगरूळ दस्तगिरचे पोलीस उपनिरीक्षक प्रनील पाटील, कॉन्स्टेबल सुनील केवतकर, संतोष तेलंग, बळवंत दाभने, मंगेश लकडे, चालक नितीन कळमकर, सायबर सेलचे कॉन्स्टेबल गुणवंत शिरसाठ, रीतेश वानखडे, सरीता चौधरी यांनी ही कारवाई केली.