अंजनगावात अडीच लाखांचे अवैध लाकूड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 11:23 PM2017-11-16T23:23:47+5:302017-11-16T23:24:18+5:30
वेळप्रसंगी विल्हेवाट लावण्यासाठी खुल्या जागेवर बेवारस ठेवलेला हजारो टन अवैध आडजात लाकडाचा साठा अंजनगाव सुर्जीत गुरुवारी जप्त करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : वेळप्रसंगी विल्हेवाट लावण्यासाठी खुल्या जागेवर बेवारस ठेवलेला हजारो टन अवैध आडजात लाकडाचा साठा अंजनगाव सुर्जीत गुरुवारी जप्त करण्यात आला. लाकूड साठा मोठ्या प्रमाणात असल्याने परतवाडा वनविभागाला क्रेनद्वारे लाकूड जप्त करावे लागले, हे विशेष. ११ जणांविरुद्ध वनगुन्हे दाखल करण्यात आले आहे.
अमरावतीचे उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांच्या आदेशाने लाकूड तस्करी रोखण्याठी धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. परतवाड्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी. बारखडे यांच्या मार्गदर्शनात अमरावती फिरते पथकाचे वनपरिक्षेत्राधिकारी महेश धंदर यांच्या चमूने ही कारवाई फत्ते केली. लाकूड साठा हा जुने बसस्टँडचे उत्तरेकडील बाजूस शहानूर नदी पात्रालगतच्या भागात ठिकठिकाणी साठवून ठेवलेला वनविभागाला आढळला. य्
ाामध्ये निंब, चिरेल, महारूख, पिंपळ, जामून, गोंदन, बाभूळ प्रजातीचे २९० नग व ४८.८६८ घनमीटर लाकूड आढळले. २ लाख ६७ हजार ६४६ रुपये किंमत वन विभागाने ठरविली आहे. याप्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१, ४२ महाराष्टÑ वन नियमावली २०१४ चे नियम ३१, ४७ चे उल्लंघन झाल्यामुळे आरोपींवर गुन्हे दाखल झाले.
वनविभागाची कारवाई
शे. आशिक शे. हसन, नाजुउद्दीन अल्लाउद्दीन, इम्रान खान, शफावत खान, रफीक शहा भोला शहा, शे. आशिक शे. युनुस, सलीम शहा भाऊ शहा, फारुख शहा जमीर शहा, अशोक बठाळे, जुबेर उद्दीन नसीम उद्दीन, अ. नसीम अ. कलाम (सर्व रा. अंजनगाव सुर्जी) यांच्याविरुद्ध वन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या जम्बो कारवाईत दर्यापूरचे वनपाल जी. व्ही. आमले, परतवाडा वनपाल बी. आर. झामरे , वनपाल एम.डब्ल्यू. वाटाणे, वनरक्षक एस.बी. बरवट, एम.जे. ठाकूर, बी.आर. पवार, पी.ए. कले, जे.टी. भारती, निर्मळ, वाटाणे, पालीयाड, तायडे, भोंडे, इंदोरे, वनपाल इंगळे आदींनी सहभाग घेतला.