अडीच हजार अंगणवाड्या बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 11:33 PM2017-09-11T23:33:36+5:302017-09-11T23:34:00+5:30
महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी कर्मचाºयांसाठी जाहीर केलेला मानधनवाढीचा प्रस्ताव वर्षभर रखडल्याने जिल्ह्यातील २४०० हजार अंगणवाडी कर्मचारी सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी कर्मचाºयांसाठी जाहीर केलेला मानधनवाढीचा प्रस्ताव वर्षभर रखडल्याने जिल्ह्यातील २४०० हजार अंगणवाडी कर्मचारी सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. शासनाने मानधनवाढीचे दिलेले आश्वासन फोल ठरल्याने संतप्त अंगणवाडी कर्मचाºयांनी आता कोणत्याही ठोस कृतीनंतरच संप मागे घेण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे जिल्हाभरातील सुमारे अडीच हजार अंगणवाड्या बंद पडल्या आहेत.
विविध मागण्यांबाबत आंदोलनाच्या माध्यमातून ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना निवेदने देण्यातद आली. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी मानधनवाढीचा प्रस्ताव तयार झाला असून आठ दिवसात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन मागण्या मंजूर करून घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु यालाही बराच कालावधी लोटून गेला आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी संपावर ठाम आहेत.
सन २०११ सालापासून इंधनासाठी देण्यात येणाºया रकमेमध्येही वाढ झालेली नाही. तेव्हा इंधनाच्या बिलामध्य्े वाढ व्हावी, अशी मागणीही शासन दरबारी केली. मात्र याचीही दखल घेतली नाही. परिणामी आता न्याय मागणीसाठी अंगणवाडी कर्मचाºयांनी हा संप पुकारल्याचे सांगितले. शासन आता या संपावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान अंगणवाडी सेविका मदतनिस पर्यवेक्षिका कर्मचारी संघटनेने इर्वीण चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.
यावेळीे संघटनेचे अध्यक्ष संजय मापले यांच्या नेतुत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रतन गुजर, चंदा नवले,रेखा गुंबळे,शालीनी देशमुख, विमल बोरकुटे,पुष्पा मेश्राम, लता दहातोंडे,मंग़ला विधळे,मिना शहाने आदीसह मोठया संख्येने अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.