शेतकरी हत्याप्रकरणी दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:14 AM2021-04-01T04:14:05+5:302021-04-01T04:14:05+5:30
तीन दिवसाची पोलीस कोठडी, पुसला येथील घटना वरूड/पुसला : पुसला येथील शेतकरी पुरुषोत्तम पाटील यांच्या हत्याप्रकरणी आरोपी दोन शेतकऱ्यांना ...
तीन दिवसाची पोलीस कोठडी, पुसला येथील घटना
वरूड/पुसला : पुसला येथील शेतकरी पुरुषोत्तम पाटील यांच्या हत्याप्रकरणी आरोपी दोन शेतकऱ्यांना पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक केली. त्यांना वरूड न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हुमनपेठ शिवारात रंगपंचमीला शेजारी शेत असलेले गजानन चरणदास चौधरी (४२, रा . पुसला) व योगेश हरिभाऊ जोगेकर (३६, रा. शेंदूरजनाघाट) यांनी धुऱ्याच्या वादातून पुरुषोत्तम पाटील (६०, रा. पुसला) यांची काठीने बदडून हत्या केली. उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनात शेंदूरजनाघाटचे प्रभारी ठाणेदार सुनील पाटील, उपनिरीक्षक सचिन कानडे , जमादार लक्ष्मण सानेंसह पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घटनेनंतर आरोपींनी शिवारातून पलायन केले होते. त्यांना शेंदूरजनाघाट पोलिसांनी ३० मार्च रोजी सायंकाळी अटक केली. दोन्ही आरोपींना बुधवारी वरूड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मृत पुरुषोत्तम पाटील यांचा मुलगा प्रणित पाटील याच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास शेंदूरजनाघाट पोलीस करीत आहेत.