गुंगीचं औषध देऊन मुलीचे आक्षेपार्ह फोटो काढले, धमकावून अत्याचार केले; दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 08:02 AM2021-02-11T08:02:41+5:302021-02-11T08:03:00+5:30

पीडितेच्या तक्रारीवरून दोघांना अटक; १५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

two arrested for taking obscene picture of minor girl and torturing her | गुंगीचं औषध देऊन मुलीचे आक्षेपार्ह फोटो काढले, धमकावून अत्याचार केले; दोघांना अटक

गुंगीचं औषध देऊन मुलीचे आक्षेपार्ह फोटो काढले, धमकावून अत्याचार केले; दोघांना अटक

Next

अमरावती: अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिचे अश्लील फोटो काढल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. मुलीवर अत्याचार करून तिला धमाकावल्याचा गुन्हा दोघांविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. न्यायालयानं दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली.

अल्पवयीन मुलीचे आक्षेपार्ह फोटो काढून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. यामध्ये एका पुरुषासह महिलेचा समावेश आहे. त्यांच्याविरोधात अत्याचार, जीवे मारण्याच्या धमकीसह पॉस्को अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मंगळवारी रात्री फ्रेजरपुरा पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं दोघांना १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

२० मे २०२० ते ८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत दोघेजण अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला धमकावत होते. घरकाम करायचं असल्याचं कारण सांगून आरोपी महिलेनं पीडित मुलीला घरी बोलावलं होतं. त्यावेळी तिला शीतपेयातून गुंगीचं औषध देण्यात आलं. त्यानंतर संशयित आरोपी सूरज रामटेके (वय ३४ वर्षे) आणि त्या महिलेनं पीडित मुलीची निर्वस्त्र छायाचित्रं काढली. त्यानंतर पीडितेला छायाचित्रं तिच्यावर अत्याचार करण्यात आले. पीडितेनं फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हे दाखवून त्यांना अटक केली.

Web Title: two arrested for taking obscene picture of minor girl and torturing her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.