पालिकेला विशेष रस्ता निधीचे दोन कोटी रुपये मंजूर
By admin | Published: March 12, 2016 12:19 AM2016-03-12T00:19:34+5:302016-03-12T00:19:34+5:30
नगरपरिषदेच्या विविध विकास कामांसाठी नगराध्यक्ष मनीषा नांगलिया व सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग,
नगराध्यक्ष नांगलियांचा प्रयत्नांना यश : शहर विकासाला मिळणार गती
चांदुर बाजार : नगरपरिषदेच्या विविध विकास कामांसाठी नगराध्यक्ष मनीषा नांगलिया व सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग, मुंबई यांच्याकडून विशेष रस्ता अनुदान योजनेंतर्गत दोन कोटी निधी मंजूर झाला आहे. यामुळे रडखलेल्या विकासाला गती मिळणार आहे.
चांदूरबाजार नगरपालिकेला गेल्या तीन वर्षांपासून रस्ता अनुदानच प्राप्त न झाल्याने शहरातील अनेक विकासकामे रखडलेली होती. पालिकेला २०१३-१४ साली फक्त ७९ हजार रुपये, सन २०१४-१५ साली १.१० लक्ष रुपये इतके नाममात्र रस्ता अनुदान मिळाले आहे. त्यामुळ शहराचा विकास खुंटला होता. याची गंभीर दखल होत नगराध्यक्षा मनीषा नांगलिया व सत्तारुढ होता. याची गंभीर दखल घेत नगराध्यक्षा मनीषा नांगलिया व सत्तारुढ नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगर विकास राज्यमंत्री रणजित पाटील यांचाकडे प्रश्न रेटून धरला होता. पालिकेकडे पूर्वीचे १ कोटींची कामे करूनही निधी उपलब्ध नसल्याने कंत्राटदारांची देयके थकीत होती. शहरात एक कोटीची कामे नव्याने सुचविल्याने रस्ता अनुदान योजने अंतर्गत पालिकेला २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
नगराध्यक्षा मनीषा नांगलीया यांनी ३१ डिसेंबर रोजी पालिकेला विकासकामांसाठी निधीची मागणी केली होती. २४ जानेवारी २०१६ रोजी नगरविकास मंत्री रणजिीा पाटील यांनी पालिकेला दिलेल्या भेटीदरम्यान पालिकेचे नगरसेवक गोपाल तिरमारे, नितीन कोरडे, भैयासाहेब लंगोटे, विशाल तायवाडे, एजाज अली, लविणा अकोलाकर, सुषमा बर्वे, मीनाक्षी औतकर यांनी विशेष मागणी केली होती. त्याची फलश्रृती म्हणून पालिकेला २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची विशेष फलश्रृती मिळाली. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत १ कोटी रुपये निधी पालकंमत्री प्रवीण पोटे यांच्या पुढाकाराने पालिकेला १७ फेब्रुवारी २०१६ ला मंजूर करण्यात आल्याने शहरातील खुंटलेल्या विकासाला गती मिळणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
चार वर्षांपासून शहरातील प्रलंबित विकासकामे या निधीमुळे मार्गी लागणार आहे. तसेच नागरिकांच्या हिताचे निर्णय मी व माझे सहयोगी नगरसेवक घेऊन शहराच्या विकासाकरिता सर्वोतेपरी प्रयत्न करू.
- मनीष नांगलिया,
नगराध्यक्षा, चांदूरबाजार
पालिकेला शासनातर्फे मिळालेल्या निधीचा शहर विकासाकरिता योग्य वापर व्हावा. पूर्वीच्या रस्त्यांनी सुद्धा मोकळा श्वास घ्यावा, याकरिता नगराध्यक्षासह नगरसेवकांनी प्रयत्न करावा.
- दत्तात्रेय किटुकले, नागरिक.