दोन दिवस सार्वत्रिक पावसाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 11:28 PM2019-07-03T23:28:07+5:302019-07-03T23:28:20+5:30

येत्या ५ जूनपर्यंत जिल्ह्यात सार्वत्रिक व काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे. तीन दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला व शिवारात खरिपाच्या पेरणीची लगबग वाढली आहे.

Two days of probability of universal rain | दोन दिवस सार्वत्रिक पावसाची शक्यता

दोन दिवस सार्वत्रिक पावसाची शक्यता

googlenewsNext
ठळक मुद्देहवामानतज्ज्ञांची माहिती : शेतकऱ्यांना दिलासा, पेरणीला वेग

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येत्या ५ जूनपर्यंत जिल्ह्यात सार्वत्रिक व काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे. तीन दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला व शिवारात खरिपाच्या पेरणीची लगबग वाढली आहे.
उत्तर छत्तीसगडवर ठळक कमी दाबाचे क्षेत्र आहे तसेच याच्याशी संबधित चक्राकार वारे ७.९ किमी उंचीवर वाहत आहेत. ते आता दक्षिणेकडे झुकले आहेत. त्याच्या प्रभावामुळे विदर्भात मंगळवारी बहुतेक ठिकाणी मध्यम ते भारी पावसाची नोंद झाली. बुधवारीही जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस कोसळला. ही स्थिती ५ तारखेपर्यंत कायम राहणार आहे. त्यानंतर पाऊस कमी होऊन ८ जूनपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडणार असल्याचे बंड यांनी सांगितले.
सातपुड्याच्या उत्तरेला असणाºया किमान विदर्भाच्या भौगोलिक क्षेत्राएवढ्या ढगामुळे विदर्भात बहुतेक ठिकानी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. मात्र, हा ढग दक्षिणेकडे सरकल्याचा फायदा पूर्व व दक्षिण विदर्भाला झाला. अमरावती जिल्हा हा रविवारी, सोमवारी कोरडाच राहिला. मुंबई येथे होत असलेल्या अतिवृष्टीमुळे अरबी समुद्रावरुन येणारा ढगाचा पुरवठा कमी झाला. यामुळे जिल्ह्यात तुरळक ठिकाणीच पावसाची नोंद झाली होती. आता बुधवारपासून तीन दिवस पावसाची रिपरिप राहणार आहे.

रेल्वे गाड्या रद्द
मुंबईत जोरदार पाऊस बरसत असल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून नागपूरकडे येणाºया चार रेल्वे गाड्या बुधवारी रद्द झाल्या. भुसावळ, नागपूर व हावडाकडे जाणाºया प्रवाशांवर प्रवास रद्द करण्याचा प्रसंग ओढवला. मुंबई-हावडा मेल, कुर्ला-हावडा शालीमार एक्स्प्रेस, मुंबई-हावडा सुपर डिलक्स आणि दादर-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. त्यामुळे मुंबई, दादर येथून या चारही रेल्वे गाड्यांचे आरक्षण रद्द झाले. बुधवारी हावडा मार्गे या गाड्यांचे आरक्षण रद्द करून प्रवास थांबवावा लागला. तथापि, गोंंिदया येथून सुटणारी विदर्भ एक्स्प्रेस ही नागपूर रेल्वे स्थानकाहून बुधवारी वेळेत आणि अंबा एक्स्प्रेस देखील मुंबईकडे नियमित वेळेत सोडण्यात आली.

Web Title: Two days of probability of universal rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.