दोन नायब तहसीलदार सांभाळतात तालुक्याचा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:18 AM2021-09-10T04:18:15+5:302021-09-10T04:18:15+5:30
तीन महिन्यापासून तहसीलदारांचे पद रिक्त वरूड : तालुक्यात १४२ गावे, ६६ ग्रामपंचायती आणि दोन नगर परिषदांचा समावेश आहे. ...
तीन महिन्यापासून तहसीलदारांचे पद रिक्त
वरूड : तालुक्यात १४२ गावे, ६६ ग्रामपंचायती आणि दोन नगर परिषदांचा समावेश आहे. २ लाख १७ हजार ७५० पेक्षा अधिक लोकसंख्या आहे . परंतु, तहसील कार्यालय तहसीलदारांअभावी सुने पडले आहे. एक तहसील कार्यालय, दोन नायब तहसीलदार कारभार सांभाळतात. तीन महिन्यांपासून रिक्त असलेल्या तहसीलदाराचे पदावर सक्षम तहसीलदार मिळणार कि नाही अशी मागणी नागरीकातून केल्या जात आहे .
वरूड तालुक्यात १४२ गावे ६६ ग्रामपंचायती आणि दोन नगर परिषदांचा समावेश आहे. २ लाख १७ हजार ७५० पेक्षा अधिक लोकसंख्या आहे . १४२ गावांचा समावेश आहे. १०२ आबाद गावे, तर ४० उजाड गावे आहेत. सात राजस्व मंडळ असून, ७ मंडळ अधिकारी , ३५ तलाठी आणि ३९ कोतवाल महसुली कामकाज करतात . तरी सुद्धा महसुली कामाचा भोंगळ कारभार नागरिकाना पाहावयास मिळतो . शेतकऱयांच्या सातबारावर अनेक चुका असल्याने शेतकरी त्रस्त आहे . येरझारा मारून उंबरठे झिजविण्यापलीकडे काहीच होत नाही . देवाणघेवाण केली केली वेळीच काम करण्याची प्रथा आहे . तलाठी वेळेवर कार्यालयात हजर नसल्याने ऐन पेरणीच्या वेळी तलाठी मिळत नाही . अभिलेखात दुरुस्त्या केल्या जात नाही अशी नागरिकांची ओरड आहे . केवळ खाबुगिरीमध्ये तहसील कार्यालयाचा कारभार सुरु असून रेती तस्करीला उधाण आले . तालुक्यातील रेती घाटाचे लिलाव प्रलंबित असले तरी रेती चोरट्याना रान मोकळे आहे . काही दलाल तहसील कार्यालयातच ठाण मांडून आपली काम काढून घेतात . वरुड तालुक्याचे शेवटचे गावाचे अंतर हे ३० ते ४० कि मी आहे . येथून येणाऱ्या शेतकरी , विद्यार्थी किंवा सर्वसामान्य नागरिकांना महसुली दाखले , प्रमाणपत्र घ्यायचे असले तर हेलपाटे मारावे लागते . अनेक कर्मचारी , अधिकारी गैरहजर असतात . तर प्रभारी तहसीलदार सुद्धा मुख्यालयी नसल्याने अनेक प्रश्न निर्माण होतात .तहसीलदारांची सेवानिवृत्तीमुळे येथे नायब तहसीलदार नंदकुमार घोडेस्वार यांची प्रभारी तहसीलदार म्हणून शासनाने नियुक्ती केली आहे . प्रभारी तहसीलदार हे अमरावती वरून येणे जाणे करतात . प्रशासकीय आणि तालुका दंडाधिकाऱ्याचे पद असल्याने २४ तास मुख्यालयी राहणे अनिवार्य आहे . परंतु तहसीलदाराचा कारभार दोन नायबतहसीलदार पाहत असून दिवस वेगळे आणि रात्री वेगळे तहसीलदार अशी अवस्था आहे . यामुळे तहसील कार्यालयावर नियंत्रण राहिले नसून भ्रष्ट्राचाराल खतपाणी घालण्याच्या प्रकाराला आळा कोण घालणार ? हा प्रश्न सर्वसामान्याना पुढे उभा ठाकला आहे . तीन महिन्यापासून रिक्त असलेल्या तहसीलदाराचे पदावर सक्षम तहसीलदार मिळणार कि नाही अशी मागणी नागरीकातून केल्या जात आहे . जिल्हाधिकारी यांनी सक्षम तहसीलदारांची नेमणूक करावी अशी नागरिकांची रास्त अपेक्षा आहे .