अचलपूर तालुक्यात गणेश विसर्जना करण्यासाठी गेलेले दोन कर्मचारी पूर्णा नदीपात्रात गेले वाहून
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 11:08 PM2024-09-17T23:08:18+5:302024-09-17T23:08:41+5:30
रात्री उशिरापर्यंत दोघांचा शोध सुरू होता
नरेंद्र जावरे, लोकमत न्यूज नेटवर्क, परतवाडा (अमरावती): अचलपूर तालुक्यातील ईसापुर शहापूर येथील सार्वजनिक गणेश मंडळात बसविलेल्या गणपती विसर्जनासाठी गेलेले दोघे पूर्णा नदीच्या पात्रात मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता वाहून गेल्याची खळबळ जनक माहिती पुढे आली आहे रात्री उशिरापर्यंत दोघांचा शोध सुरू होता. दोघेही बँक व ग्रामपंचायत कर्मचारी असल्याची माहिती पुढे आली आहे.
अमोल ईश्वरदास ठाकरे३८ ग्रामपंचायत कर्मचारी असून व मयूर गजानन ठाकरे दोन्ही राहणार ईसापुर शामपूर असे पूर्णा नदीच्या पात्रात वाहून गेलेल्या दोघांची नावे आहेत ते गावातील सार्वजनिक गणेशोत्सव दरम्यान बसविलेला गणपती विसर्जनासाठी इतर सहकाऱ्यांसह पूर्णा नगर येथे पूर्णा नदीच्या पात्रात गेले असता बाहेर आलेले नाहीत त्यांचा शोध घेणे गावकरी व पोलीस घेत आहेत.
या घटनेने संपूर्ण पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे सदर घटनेला शेतकरी संघटनेचे श्यामपूर ईसापुर येथील सोमेश ठाकरे यांनी लोकमतशी बोलताना दुजोरा दिला.