मध्य रेल्वे भुसावळ विभागात दोन बनावट टीसी जेरबंद, रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई
By गणेश वासनिक | Published: June 29, 2023 02:15 PM2023-06-29T14:15:11+5:302023-06-29T14:15:44+5:30
जनरल डब्यात तिकीट तपासणी करताना आढळले
अमरावती : मध्य रेल्वेभुसावळ विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाने गुरुवारी धावत्या गाडीत दोन बनावट टीसींना रंगेहाथ पकड्यात आले. मध्य रेल्वे आरपीएफ (रेल्वे संरक्षण दल) च्या सहयोग अंतर्गत कारवाईसाठी रेल्वे पाेलिसांना ताब्यात दिले आहे.
रावेर स्थानकावर २८ जून रोजी आरपीएफ तैनात शिपाई रामब्रेश यांनी गाडी क्रमांक १११२७ भुसावळ- कटनी एक्स्प्रेसमधील भोलेनाथ प्रेमनाथ गौर (६८) व्यवसाय मार्केटिंग, गणेश बिल्डिंग, शिवाजी नगर, भुसावळ या दोन प्रवाशांच्या माहितीनुसार ट्रेनमध्ये टीसी असल्याचे दाखवून जनरल डब्यात प्रवाशांकडील तिकीट तपासत आहेत. या डब्याची झडती घेतली असता दोन्ही संशयितांना आरपीएफ हवालदाराने पकडून फिर्यादीला दाखवले. त्यांच्या ओळखीवरून दोन्ही संशयितांना अटक करून आरपीएफ स्टेशन भुसावळ यार्ड येथे आणले. तक्रारदार आरपीएफ स्टेशन भुसावळ यार्ड येथे हजर झाले.
आरपीएफचे अधिकारी सौनी विकास साळुंके यांनी आरोपींची चौकशी केली असता अरविंद तिवारी (२६, उचेहरा, तालुकाउचेहरा, जिल्हा सतना, शुभम पांडे (२०, पूर्वा, तालुका गर्ग, जिल्हा रेवा) या दोन बनावट टीसींना ताब्यात घेण्यात आले. भुसावळ रेल्व पोलिसांनी दोनही आरोपीविरूद्ध १७०,५०४, ३४ आयपीसी अन्वये ६९१ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.