पोळ्याच्या पूर्वसंध्येला अमरावती जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 05:05 PM2017-08-21T17:05:22+5:302017-08-21T17:06:52+5:30
रविवारी पोळ्याच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यात दोन शेतकºयांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या. मोर्शी तालुक्यातील काटपूर ममदापूर येथील देवीदास डोमाजी इंगळे (६७) याने विहिरीत उडी घेऊन, तर
अमरावती : रविवारी पोळ्याच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यात दोन शेतकºयांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या. मोर्शी तालुक्यातील काटपूर ममदापूर येथील देवीदास डोमाजी इंगळे (६७) याने विहिरीत उडी घेऊन, तर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हिवरा मुरादे येथील बाळू आत्माराम मुरादे (४८) या शेतकºयाने विष प्राषण करून आत्महत्या केली.
प्राप्त माहितीनुसार, काटपूर येथील मृत देवीदास तीन दिवसांपासून बेपत्ता होते. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, रविवारी सायंकाळच्या सुमारास वाघोली शिवारातील सुधाकर फरतोडे यांच्या शेताच्या विहिरीत त्यांचा मृतदेह दिसून आला. त्यांच्यावर बँक आॅफ इंडियाचे अडीच लाखांचे कर्ज होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. त्यांनी १० हजारांच्या कर्जासाठी अर्ज केला होता. मागील तीन वर्षांपासून होणारी सततची नापिकी, यंदा पावसाची दडी व कर्ज न मिळाल्यामुळे ते मागील काही दिवसांपासून चिंतेत होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे. याप्रकरणी शिरखेड पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
दुसरी घटनेत हिवरा (मुरादे) येथील मृतक शेतकरी बाळू आत्माराम मुरादे सततच्या नापिकीमुळे व यंदा पावसाने दडी दिल्यामुळे चिंताग्रस्त होते. कर्ज मिळाले नाही व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा असा प्रश्न त्यांना पडला होता. याच विवंचनेतून त्यांनी स्वत:च्या शेतात विष प्राषण करून आत्महत्या के ली. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा आप्त परिवार आहे.