अचलपुरातील दोन माजी नगरसेवक भूमिगत

By admin | Published: August 24, 2015 12:28 AM2015-08-24T00:28:48+5:302015-08-24T00:28:48+5:30

अमित बटाऊवाले हत्याकांडातील आरोपी असलेल्या बारूद गँगचे सदस्यांची मूळ नावापेक्षा टोपण नावाने प्रसिद्धी होती.

Two former corporators of Achalpur underground | अचलपुरातील दोन माजी नगरसेवक भूमिगत

अचलपुरातील दोन माजी नगरसेवक भूमिगत

Next

वाहने जप्त : बारूद गँगच्या सदस्यांची टोपण नावे
अमरावती / अचलपूर : अमित बटाऊवाले हत्याकांडातील आरोपी असलेल्या बारूद गँगचे सदस्यांची मूळ नावापेक्षा टोपण नावाने प्रसिद्धी होती. पोलीस कोठडीतील नऊ आरोपींचा रिमांड सोमवारी संपत असल्याने त्यांना न्यायालयापुढे हजर केले जाईल. आरोपींनी अजूनपर्यंत कुठलीही महत्त्वपूर्ण माहिती दिली नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी एक ट्रॅक्टर व एक अल्टो गाडी ताब्यात घेतली आहे.
११ आॅगस्ट रोजी रेती तस्करांनी अमित बटाऊवाले याची निर्घृण हत्या केली. त्यातील नऊ आरोपी पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. त्यांना २० तारखेपर्यंत न्यायालयाने पोलीस कस्टडी रिमांड दिला होता. त्यानंतर त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड २४ तारखेपर्यंत न्यायालयाने वाढवून दिला. १३ दिवसांच्या कस्टडी रिमांडमध्ये आरोपींनी खुनाचा कट कुठे रचला, यामागील मुख्य सूत्रधार कोण, एकूण आरोपी किती, बारूद गँगचा उद्देश काय, सभासद किती, यासंदर्भात ठोस माहिती अजूनही पोलिसांना दिली नसून आरोपींची देश विघातक संघटनेशी संबंध आहे का, याचीही चाचपणी पोलीस करीत असल्याची माहिती मिळाली.
न्यायालयाने सदर आरोपींना २४ पर्यंत पोलीस कोठडी दिली होती. परंतु पोलिसांना अपेक्षित माहिती अद्यापही मिळाली नसल्याने ते सोमवारी पुन्हा न्यायालयात पोलीस कोठडी वाढवून मागणार असल्याचे सूत्रांकडून समजले. आतापर्यंत आरोपींकडून फक्त १ कुऱ्हाड आणि दोन-तीन लोखंडी पाईप पोलिसांनी जप्त केले आहेत. दरम्यान रेती तस्करीसाठी आरोपी वापरत असलेले एक ट्रॅक्टर सुलतानपुरा भागातील एका शेताजवळून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच खुनाशी संबंधित असलेली एक अल्टो गाडीही ताब्यात घेतली आहे. ट्रॅक्टर व कारचा मालक कोण, हेच वाहने आरोपी उपयोगात आणत होते काय, यासंबंधी संपूर्ण चौकशी झाल्यानंतर जप्तीची कारवाई सुरू होईल, असे पोलीस सांगतात. (प्रतिनिधी)
म्होरक्याचे नाव बदलविले
बारूद गँगच्या सदस्यांनी गुन्हा केल्यानंतर ते पकडले जाऊ नये म्हणून मूळ नाव गुप्त ठेवून टोपण नावाने ते परिचित झाले होते. त्यांची टोपण नावे शुटर, पप्पू, बादशा, रॉकी, काल्या, गवई, लकी, माया, रम्मू, जम्मू अशी होती. काही दिवसांपूर्वी एका म्होरक्याचे मूळ नाव बदलून जब्बार नावाने त्याला लाँच करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू झाला होता. त्याला काहीअंशी यशही आले होते. जब्बार नावाने लोक त्याची ओळख देत होते. अशा टोपण नावाचे एकूण किती सदस्य आहेत, त्यातील सशस्त्र विभाग कोणाकडे होते, हे जाणून घेण्याची लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
४एखाद्या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर किंवा गुन्हा घडविल्यानंतर यातील कित्येकांना टोपण नावाचा लाभ मिळाला. ते यातून सुटले आहेत.
४बारूद गँग हत्याकांड घडल्यानंतर शहरातून दोन माजी नगरसेवक दिसेनासे झाले आहेत. त्यांचा या गँगशी संबंध काय, असा प्रश्न जनतेला पडला आहे.

Web Title: Two former corporators of Achalpur underground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.