अमरावतीच्या भारत्तोलकांना राज्यस्तरीय स्पर्धेत दोन सुवर्णपदके
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2018 06:08 PM2018-01-06T18:08:39+5:302018-01-06T18:08:50+5:30
अकोला येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय भारत्तोलन स्पर्धेत अमरावतीच्या भारत्तोलकांनी दोन सुवर्णपदकांसह अनेक पदकांची कमाई केली.
अमरावती : अकोला येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय भारत्तोलन स्पर्धेत अमरावतीच्या भारत्तोलकांनी दोन सुवर्णपदकांसह अनेक पदकांची कमाई केली. दीक्षा गायकवाडची येथून पुढील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. अकोला येथे २९ ते ३१ डिसेंबर रोजी झालेल्या ७० वी पुरुष व ३३ वी महिला राज्यस्तरीय भारत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत जिल्ह्यातील खेळाडूंनी पदके जिंकली. ५३ किलो गटात पूजा दिनकर केने हिने सुवर्णपदक व ओव्हरआॅल चॅम्पियनशिपमध्येदेखील सुवर्णपदक पटकावले.
९० किलो गटात १५ वर्षाची प्रीती प्रमोद देशमुख हिने दोन रौप्य, तर ६९ किलो गटात शुभम लांडे याने एक रौप्य व एक कांस्यपदक पटकावले. आंतरराष्ट्रीय खेळाडू दीक्षा गायकवाड हिची ५८ किलो गटात पुढील महिन्यातील वरिष्ठ स्पर्धेकरिता बिनविरोध निवड करण्यात आली. ६३ किलो गटात पल्लवी विनोद पवार व ६२ किलो गटात शुभम ढोमणे यांनी सहभाग घेतला. नगरसेवक प्रशांत वानखडे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, विद्यापीठ क्रीडा अधिकारी अविनाश असनारे, जिल्हा भारत्तोलन संघटनेचे अध्यक्ष संचित पांडे, सचिव तथा प्रशिक्षक अंकुश एलगुंदे, वरिष्ठ खेळाडू प्रणीत देशमुख, सारंग ठाकरे, शुभम चावरे, लोकेश भोपाळे, हमीद हागे यांना खेळाडूंनी यशाचे श्रेय दिले आहे.