गाडगेनगर हद्दीत दोन घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 01:22 AM2019-08-20T01:22:35+5:302019-08-20T01:22:58+5:30

गाडगेनगर हद्दीतील दोन बंद घरांना चोरट्यांनी लक्ष्य करून दीड लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. दत्त विहाराजवळील मोहनदीप व साकेत कॉलनीत घरफोडीच्या या घटना घडल्या असून, रहिवाशांमध्ये पुन्हा चोरांची भीती निर्माण झाली आहे.

Two houses broke into Gadagnagar area | गाडगेनगर हद्दीत दोन घरफोड्या

गाडगेनगर हद्दीत दोन घरफोड्या

Next
ठळक मुद्देदीड लाखांचा मुद्देमाल लंपास : मोहनदीप, साकेत कॉलनीतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गाडगेनगर हद्दीतील दोन बंद घरांना चोरट्यांनी लक्ष्य करून दीड लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. दत्त विहाराजवळील मोहनदीप व साकेत कॉलनीत घरफोडीच्या या घटना घडल्या असून, रहिवाशांमध्ये पुन्हा चोरांची भीती निर्माण झाली आहे.
शहरातील गाडगेनगर व राजापेठ हद्दीत सर्वाधिक घरफोडी व चोरीच्या घटना घडल्या. मध्यंतरी चोरांनी बंद घरांना लक्ष्य करून नागरिकांच्या घरातील लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. दरम्यानच्या काळात पोलिसांनी चोरांना अटक करून मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर काही दिवस चोऱ्या बंद झाल्या होत्या. मात्र, आता पुन्हा बंद घरांना चोरांनी लक्ष्य केले जात आहे. घरांचा कडीकोंडा तोडून चोरी करण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. घटनेच्या माहितीवरून गाडगेनगर पोलिसांनी श्वान पथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण केले. श्वान काही अंतरापर्यंत जाऊन थांबले. ठसेतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीवरून रेकॉर्डवरील आरोपींचे ठसे तपासले जाणार आहेत.

मोहनदीप कॉलनीतून दीड लाखांची घरफोडी
मोहनदीप कॉलनीतील रहिवासी कृष्णाजी विठोबा चौधरी (६१) हे कृषी विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. ते १३ आॅगस्ट रोजी कुटुंबीयांसह पुणे येथे मुलाच्या घरी गेले होते. १९ आॅगस्टला ते परतले तेव्हा कडीकोंडा तुटलेला होता. चोरांनी घरातील आलमारी व कपाट फोडून १५ हजारांची रोख व ५० गॅ्रमचे सोन्याचे दागिने असा दीड लाखांचा ऐवज लंपास केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी गाडगेनगर पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.

साकेत कॉलनीत चोरी
साकेत कॉलनीतील रहिवासी निळकंठ त्र्यंबक केराम (६३) बीएसएनएलमधून सेवानिवृत्त झाले असून, दोन मजली इमारतीत मुलासोबत राहतात. मुलगा वरच्या मजल्यावर राहतो. रविवारी रात्री निळकंठ केराम यांनी खालच्या घराला कुलूप लावले आणि मुलाच्या घरात झोपायला गेले. सोमवारी सकाळी ते खाली आले असता, त्यांना कडीकोंडा तुटलेला दिसला. गाडगेनगर पोलिसांनी पंचनामा केला. घरातून १५ हजारांचे सहा ग्रॅ्रम सोन्याचे दागिने चोरांनी लंपास केल्याचे आढळले.

Web Title: Two houses broke into Gadagnagar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर