शेंदूरजन्यात दोन घरे जळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:13 AM2021-05-27T04:13:23+5:302021-05-27T04:13:23+5:30

शॉर्टसर्किट, जीवनावश्यक साहित्यासह लाखोंची हानी तळेगाव दशासर : येथून पाच किमी अंतरावरील शेंदूरजना खुर्द येथे बुधवारी दुपारी १२ च्या ...

Two houses were burnt in Shendoorjan | शेंदूरजन्यात दोन घरे जळाली

शेंदूरजन्यात दोन घरे जळाली

Next

शॉर्टसर्किट, जीवनावश्यक साहित्यासह लाखोंची हानी

तळेगाव दशासर : येथून पाच किमी अंतरावरील शेंदूरजना खुर्द येथे बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास लागलेल्या आगीत दोन घरे जळाली. यात जीवितहानी टळली असली तरी लाखोंचे नुकसान झाले आहे.

तळेगाव-चांदूर रेल्वे मार्गावरील शेंदूरजन्यात बुधवारी दुपारी थोडा वेळ वादळी वारे वाहिले. त्यामुळे तारांमध्ये घर्षण होऊन शॉर्टसर्किट झाले. परिणामी इंदिरानगरातील विष्णू मेश्राम व अंतुजी मेश्राम यांची लागून असलेल्या घरातील गवत, इंधनाने पेट घेतला आणि दोन्ही घरांना आग लागली. यात जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य समवेत टीव्ही, पंखे जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले.

चांदूर रेल्वे मार्गाचे काम चालू असल्याने तेथील पाण्याच्या टँकरच्या मदतीने ग्रामस्थांनी लोकांनी आगीवर काही प्रमाणात आगीवर नियंत्रण मिळविले. सरपंच, पंचायत समिती सभापती, माजी पंचायत समिती सदस्य व तळेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठले. यानंतर चांदूर रेल्वे नगरपरिषदेच्या अग्निशमन वाहनाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविले.

Web Title: Two houses were burnt in Shendoorjan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.