औरंगाबाद-नागपूर महामार्गावर दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2022 05:00 AM2022-03-27T05:00:00+5:302022-03-27T05:00:22+5:30

पोलीस सूत्रांनुसार, तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या अपघातामध्ये कारचा चालक गौरव लक्ष्मण ठवकर (२७, रा. कासमपूर) व त्यामधून प्रवास करीत असलेल्या मीरा भीमराव बेदरकर (रा. पिंपळखुटा) यांचा समावेश आहे. एमएच ३१ सीएम ३४७७ क्रमांकाची कार यवतमाळ जिल्ह्यातील घारफळ देवगावकडे निघाली होती. यात चालक व महिलांसह अन्य प्रवासी होते. बोरवघडनजीक एमएच ०२ एफजी २७५८ क्रमांकाच्या पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली.

Two killed on Aurangabad-Nagpur highway | औरंगाबाद-नागपूर महामार्गावर दोन ठार

औरंगाबाद-नागपूर महामार्गावर दोन ठार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव दशासर : औरंगाबाद-नागपूर सुपर एक्स्प्रेस हाय-वेवर बोरवघडनजीक शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास दोन चारचाकी वाहने आपसांत धडकली. या अपघातात दोघे ठार झाले. यात चालक व महिलेचा समावेश आहे.
पोलीस सूत्रांनुसार, तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या अपघातामध्ये कारचा चालक गौरव लक्ष्मण ठवकर (२७, रा. कासमपूर) व त्यामधून प्रवास करीत असलेल्या मीरा भीमराव बेदरकर (रा. पिंपळखुटा) यांचा समावेश आहे. एमएच ३१ सीएम ३४७७ क्रमांकाची कार यवतमाळ जिल्ह्यातील घारफळ देवगावकडे निघाली होती. यात चालक व महिलांसह अन्य प्रवासी होते. बोरवघडनजीक एमएच ०२ एफजी २७५८ क्रमांकाच्या पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. गौरव व मीरा बेदूरकर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तळेगाव दशासर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत चौधरी यांच्या ताफ्यासह देवगावस्थित महामार्ग पोलीस केंद्राचे उपनिरीक्षक तोकलवाड व कर्मचारी पोहोचले. अपघातामुळे विस्कळीत वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली व दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी धामणगाव रेल्वे येथे पाठविण्यात आले, 
वैभव गायके (२६), तेजस्विनी वैभव गायके (२३) व नेहा बिदूरकर (२१) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना सावंगी मेघे येथे उपचाराकरिता पाठविले. याप्रकरणी भीमराव बेदूरकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पिकअप वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. ठाणेदार हेमंत चौधरी यांच्या मार्गदर्शनात जमादार ठाकरे तपास करीत आहेत.

अकोला महामार्गावर अपघात, एकाचा मृत्यू
बडनेरा : अकोला महामार्गावरील एका हॉटेलनजीक ४५ वर्षीय इसमाला गुरुवारी उशिरा रात्री दुचाकीने घरी परत जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिली. गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्रवीण कानतोडे (रा. कंपासपुरा, जुनीवस्ती, बडनेरा) असे मृताचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ आहे.

 

Web Title: Two killed on Aurangabad-Nagpur highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात