गोविंदांवर सव्वा दोन लाख लिटर पाण्याचे फवारे

By admin | Published: September 7, 2015 12:36 AM2015-09-07T00:36:10+5:302015-09-07T00:36:10+5:30

शहरातील तीन मुख्य चौकांमध्ये एकाच दिवशी दहिहंडी स्पर्धा पार पडल्यात.

Two lakh liters of water springs in Govind | गोविंदांवर सव्वा दोन लाख लिटर पाण्याचे फवारे

गोविंदांवर सव्वा दोन लाख लिटर पाण्याचे फवारे

Next

पाण्याचा अपव्यय : तीन दहिहंडी स्पर्धा, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अमरावती : शहरातील तीन मुख्य चौकांमध्ये एकाच दिवशी दहिहंडी स्पर्धा पार पडल्यात. त्याकरिता सुमारे सव्वा दोन लाख लिटर पाण्याचा अपव्यय झाला आहे. एकीकडे पाण्याच्या अभावी दुष्काळग्रस्त स्थितीचा सामना करण्याची वेळ नागरिकांवर येते. दुसरीकडे धार्मिक भावनेतून पाण्याचा अपव्ययसुध्दा नागरिकांकडून होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
पाणी हे मानवी जीवनासाठी अत्यावश्यक आहे. थेंब थेंब तळे साचे ही म्हण प्रचलित आहे. काहीप्रसंगी जिल्ह्यात पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकंती करावी लागते. अनेक वेळा उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तीनही ऋतूंमध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पाण्याला इतके महत्त्व असतानाही धार्मिक भावनेतून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होताना दरवर्षीच दिसून येतो. रविवारी शहरात गोविंदांच्या दहिहंडीची धूम सुरूझाल्यावर 'गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिजबाला'च्या गीतावर तरुण थिरकले.
गोविंदाच्या अंगावर अग्निशमन विभागाकडून पाण्याचे फवारे उडविले जात होते. पाणी पुरवठ्याचे पैसे अग्निशमन विभागाकडून आकारण्यात आले आहे. मात्र, दरवर्षीच लाखो लिटर पाणी नाल्यातून वाहत जाते. अग्निशमन विभागाकडून एका दहिहंडी स्पर्धेकरिता सुमारे २५ वाहनांनी पाणीपुरवठा केला जातो. त्यांच्या एका गाडीत तब्बल तीन हजार लिटर पाणी साठवले जाऊ शकते.
अशातच शहरात एकाच दिवशी तीन ठिकाणी दहिहंडी स्पर्धा असल्यामुळे सुमारे सव्वा दोन लाख लिटर पाण्याचे फवारे गोविंदाच्या अंगावर उडविण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असतानाही प्रशासनाकडून पाणी अपव्ययाबाबत काही मर्यादा का आखल्या जात नाहीत, असा प्रश्न उद्भवत आहे, याकडे जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आता काळाची गरज असल्याचे मत निसर्गपे्रमींनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)

नगरसेवकांच्या निधीतून पाणी खर्च
दहीहंडी स्पर्धांत पाणीपुरवठा व्हावा याकरिता नगरसेवकांकडून अग्निशमन दलाला पत्र पाठविण्यात येते. त्यामध्ये पाणी खर्च नगरसेवकांच्या निधीतून कपात करण्यात यावे, असे नमूद केले जाते. तेव्हा अग्निशमन विभाग पाण्याच्या मागणीनुसार पाणीपुरवठा करते. सुरुवातीला एकाच टँकरने पाणी पुरवठा केला जातो. त्याकरिता प्रथम तीन तासांचे चार हजार रुपये आकारण्यात येते व त्यानंतरच्या पाणीपुरवठ्यासाठी प्रतिटँकर एक हजार रुपये याप्रमाणे पैसे आकारले जाते.

धार्मिक कार्यक्रमात जनभावनेचा विचार करून दरवर्षीच दहीहंडी कार्यक्रमात लाखो लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. यंदा तीन मोठ्या दहीहंडी स्पर्धांना पाणी पुरवठा करण्यात आला आहे. त्याप्रमाणे पैसेसुध्दा आकारण्यात येते. आम्ही आमचे काम पूर्ण करीत आहेत.
-भरतसिंह चव्हाण, अधिक्षक

Web Title: Two lakh liters of water springs in Govind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.