देशीसाठी दोन तर, विदेशीसाठी पाच रूपयांचा परवाना आवश्यक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 05:00 AM2021-12-13T05:00:00+5:302021-12-13T05:00:57+5:30
देशी दारू सेवन करण्यासाठी दाेन रुपये, विदेशी दारूसाठी पाच रुपयांचा दरदिवशी परवाना आवश्यक आहे. या नियमांचे कोणीही मद्य विक्रेता पालन करीत नाही. जिल्ह्यात देशी दारू १५२, विदेशी दारू ३२, बियर बार ३५०, तर बिअर शॉपीची ४५ दुकाने आहेत. यापैकी एकाही मद्य विक्री दुकानात मद्य सेवन परवाना विचारत नाही. मात्र, मद्य विक्रेत्यांकडे मद्य सेवन परवाना रेकॉर्ड नीट ठेवला जातो. परवानाचे शुल्कही एक्साईजकडे भरले जातात.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमानुसार दुकानातून मद्य खरेदी करताना मद्य सेवन परवाना आवश्यक आहे. मात्र, शहर, ग्रामीण अशा दोन्ही भागात मद्य विक्रेत्यांकडून नियमावली गुंडाळून दारू विक्री केली जात आहे. देशीसाठी दोन तर, विदेशीसाठी पाच रुपयांचा परवानाशिवाय मद्य विक्री राजरोसपणे सुरू आहे. हा प्रकार म्हणजे राज्य शासनाचे उत्पन्न बुडविणारा ठरत आहे.
उत्पादन शुल्क विभागाच्या मद्य विक्री करण्यासाठीची नियमावली ही कठोर आहे. मात्र, मद्य विक्रेते या नियमांवलीचे पालन करीत नाही, हे वास्तव आहे. यात वाईन शॉप, देशी दारू अथवा बियर बारचे संचालक कोणत्याही ग्राहकाला मद्य सेवन परवाना असल्याबाबत विचारणा करीत नाही. कोणीही यावे आणि दारू घेऊन जावे, असा प्रकार सुरू आहे. खरे तर देशी दारू सेवन करण्यासाठी दाेन रुपये, विदेशी दारूसाठी पाच रुपयांचा दरदिवशी परवाना आवश्यक आहे. या नियमांचे कोणीही मद्य विक्रेता पालन करीत नाही. जिल्ह्यात देशी दारू १५२, विदेशी दारू ३२, बियर बार ३५०, तर बिअर शॉपीची ४५ दुकाने आहेत. यापैकी एकाही मद्य विक्री दुकानात मद्य सेवन परवाना विचारत नाही. मात्र, मद्य विक्रेत्यांकडे मद्य सेवन परवाना रेकॉर्ड नीट ठेवला जातो. परवानाचे शुल्कही एक्साईजकडे भरले जातात.
परवाना असेल तरच मद्य नियमांचा फज्जा
- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमावलीनुसार मद्य सेवन करण्यासाठी परवाना आवश्यक आहे. मात्र, परवाना असेल तरच मद्य अशा प्रकाराचे फलक लावण्याची सक्ती नाही.
- मद्य विक्रेेत्यांकडून दारू विक्रीच्या तुलनेत मद्य सेवन परवाना रेकॉर्ड व्यवस्थित ठेवतात. त्यानुसार दुकानात एक्साईज निरीक्षक तपासणीला आले की मद्य विक्री आणि सेवन करण्याचा परवान्याचा ताळमेळ जुळविला जातो.
ना दुकानावर फलक
ना परवान्याची विचारपूस
लहान मुले, महिलांना मिळते दारू
शहरातील काही मद्य विक्री दुकानात परवाना न विचारता लहान मुलांसह महिलांनाही बिनदिक्कतपणे दारू दिली जाते. कुणीही यावे पैसे द्यावे आणि मद्य घ्यावे, असा प्रकार निदर्शनास आला आहे.
परवानाचे फलक कुठेही नाही
अमरावती, बडनेरा शहरातील कोणत्याही मद्य विक्री दुकानात मद्या सेवन करण्यासाठी परवाना लागेल, अशा आशयाचे फलक लावण्यात आले नाही. सकाळी १० वाजतापूर्वीच मद्य विक्री दुकानांसमोर जणू यात्रा हे चित्र नियमित आहे.
१०० रुपयात वर्षभर, तर हजार रुपयात आजीवन परवाना
मद्य सेवन करण्याचा परवाना ऑनलाईन देण्याची सुविधा आहे. त्याकरिता आधार कार्ड आवश्यक असून, १०० रुपयांत वर्षभर आणि एक हजारात मद्य सेवनाचा आजीवन परवाना दिला जातो.