दर्यापूर येथील दोन मंगल कार्यालयांना एक लाखाचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:10 AM2021-05-29T04:10:48+5:302021-05-29T04:10:48+5:30
दर्यापूर : शहरात दोन मंगल कार्यालयांतील सोहळ्यात निर्धारित संख्येपेक्षा अधिक वऱ्हाडी आढळल्याने प्रत्येकी ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आला. प्रसाद ...
दर्यापूर : शहरात दोन मंगल कार्यालयांतील सोहळ्यात निर्धारित संख्येपेक्षा अधिक वऱ्हाडी आढळल्याने प्रत्येकी ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आला.
प्रसाद मंगल कार्यालयात बुधवारी आयोजित एका लग्नात ६० ते ७० वऱ्हाडी असल्याचे तसेच गुरुवारी वैभव मंगल कार्यालयातसुद्धा नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समजताच प्रशासनाच्यावतीने मंगल कार्यालय संचालकांना प्रत्येकी ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आला. पोलिसांनी वर-वधुपित्यांविरुद्ध कारवाईसुद्धा केली. कारवाईदरम्यान तहसीलदार योगेश देशमुख, पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम, पोलीस उपनिरीक्षक रविकिरण खंदारे, बजरंग इंगळे, शरद सारसे, वृषाली वाळसे उपस्थित होते.
बॉक्स
दर्यापूर पोलिसांनी बुधवारी अमरावती रोडवरील एका हॉटेलची झडती घेतली. त्यामागे अवैधरीत्या देशी-विदेशी दारू मिळाल्याने कारवाई करण्यात आली. माहुली धांडे येथे हेअर सलूनमालकाविरुद्ध कलम १८८ प्रमाणे कारवाई करण्यात आली.
===Photopath===
280521\img-20210527-wa0020.jpg
===Caption===
दर्यापूर येथील दोन मंगल कार्यालयाला 1 लाखाचा दंड