‘मार्इंड लॉजिक’चे पाऊणे दोन कोटी रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 11:14 PM2019-05-27T23:14:50+5:302019-05-27T23:15:32+5:30

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आॅनलाईन परीक्षेशी संबंधित कामांची जबाबदारी सांभाळणाऱ्या बंगळुरू येथील ‘माइंड लॉजिक’ कंपनीचे पाऊणे दोन कोटी रूपयांची देयके रोखण्यात आली आहेत. ७ जूनपासून या कंपनीकडून प्रश्नपत्रिका केंद्रावर आॅनलाईन पाठविण्याची जबाबदारी काढून घेतली जाणार आहे.

Two millions of rupees of 'mind logic' were stopped | ‘मार्इंड लॉजिक’चे पाऊणे दोन कोटी रोखले

‘मार्इंड लॉजिक’चे पाऊणे दोन कोटी रोखले

googlenewsNext
ठळक मुद्दे‘मार्इंड लॉजिक’चे पाऊणे दोन कोटी रोखले

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आॅनलाईन परीक्षेशी संबंधित कामांची जबाबदारी सांभाळणाऱ्या बंगळुरू येथील ‘माइंड लॉजिक’ कंपनीचे पाऊणे दोन कोटी रूपयांची देयके रोखण्यात आली आहेत. ७ जूनपासून या कंपनीकडून प्रश्नपत्रिका केंद्रावर आॅनलाईन पाठविण्याची जबाबदारी काढून घेतली जाणार आहे.
विधी, फॉर्मसी आणि अभियांत्रिकी या अभ्यासक्र माच्या आॅनलाईन परीक्षा, निकालात यापूर्वी प्रचंड गोंधळ उडाला आहे. त्यामुळे अमरावती विद्यापीठाच्या आॅनलाईन कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. ‘माइंड लॉजिक’ने करारनाम्याला छेद दिल्याप्रकरणी अधिसभेत चर्चेअंती ‘माइंड लॉजिक’च्या परीक्षेशी निगडीत आॅनलाईन कारभाराची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. कुलगुरूंच्या निर्देशानुसार प्राचार्य ए.बी.मराठे समितीकडे चौकशीची धुरा सोपविली गेली. मराठे समितीने परीक्षेच्या आॅनलाईन कामकाजाबाबत वस्तुनिष्ठ अहवाल सादर केला. या समितीने माइंड लॉजिकच्या कारभारावर बोट ठेवले. आॅनलाईन निकाल आणि कें द्रावर प्रश्नपत्रिका पाठविण्याचे दर यात बरेर गौडबंगाल असल्याचा ठपका ठेवण्यात आला. मराठे समितीने सादर केलेला चौकशी अहवाल व्यवस्थापन परिषदेसमोर मांडला गेला. व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी सुद्धा ‘माइंड लॉजिक’वर अधिकाअधिक कारवाईचा निर्णय घेतला. त्यामुळे ‘माइंड लॉजिक’ने पाऊणे दोन कोटींची रकक्कम मिळण्यासाठी वित्त विभागाकडे देयके सादर केली आहेत. तथापि , कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर यांच्या निर्देशसानुसार ‘माइंड लॉजिक’ला थकित देयके अदा करू नये याचे पालन करण्यात येत आहे. विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी भारत कऱ्हाड यांनी ही देयके रोखली आहेत. तर दुसरीकडे देयकांचे रक्कम मिळण्यासाठी माइंड लॉजिक कंपनीच्या प्रबंधकांकडून दबावतंत्र वापरले जात आहे. मात्र विद्यापीठातून ‘माइंड लॉजिक’ला ७ जूननंतर ‘गो बॅक’ केले जाईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
एक कोटी सहा लाखांचा आकारला दंड
आॅनलाईन परीक्षा आणि निकालत उडालेल्या गोंधळाला विद्यापीठ प्रशासनाने ए.बी. मराठे समितीच्या चौकशी अहवालानुसार दोषी ठरविले आहे. या कंपनीविरुद्ध एक कोटी सहा लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. करारनाम्यात काही त्रुटा असल्याने याचा आर्थिक फटका विद्यापीठाला बसला आहे. आतापर्यंत ४६ लाखांचा दंड माइंड लॉजिककडून वसूल करण्यात आला आहे.

Web Title: Two millions of rupees of 'mind logic' were stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.