फसवणूकप्रकरणी आणखी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2016 12:23 AM2016-03-10T00:23:15+5:302016-03-10T00:23:15+5:30

बनावट धनादेश बँकेत वटवून २२ लाख ६० हजारांनी फसवणूक केल्याच्या प्रकरणात बुधवारी पोलिसांनी बनावट दस्ताऐवजाच्या आधारे बँकेत खाते उघडणाऱ्या दोघांना जबलपूरवरून अटक करण्यात आली.

Two more arrested for cheating | फसवणूकप्रकरणी आणखी दोघांना अटक

फसवणूकप्रकरणी आणखी दोघांना अटक

Next

जबलपूर येथे धडक : आरोपींच्या घराची झाडाझडती
अमरावती : बनावट धनादेश बँकेत वटवून २२ लाख ६० हजारांनी फसवणूक केल्याच्या प्रकरणात बुधवारी पोलिसांनी बनावट दस्ताऐवजाच्या आधारे बँकेत खाते उघडणाऱ्या दोघांना जबलपूरवरून अटक करण्यात आली. गोल्डी नारायणप्रसाद विश्वकर्मा (२७) व गोलू रमेशचंद्र श्रीवास्तव (२८, दोन्ही रा. कच्छपुरा, जबलपूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींची संख्या आता सहा झाली आहे.
आरोपींच्या घराची झाडाझडती पोलिसांनी घेतली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुदीप सोनी व विक्रम घोगरे या दोघांची दोन बँकेतील पाच खाती पोलिसांनी गोठविली आहेत.
धारणी येथील आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयाचे बनावट धनादेश बनविणारा सुदीप श्रीराम सोनी (४८, रा. महाल, नागपूर) याची पोलीस कोठडीत चौकशी सुरु आहे. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी विक्रम घोगरे (३५, रा. खुमारी, धारणी), प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी दुर्याधन जावरकर (रा.धारणी), पप्पी ऊर्फ पवन कमलाकर चोथे (रा. महाल, नागपूर) व विक्रम घोगरे (रा. महाल, नागपूर) यांना अटक केलीे.

सोनीच्या सूचनेनुसार उघडले खाते
अमरावती : मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश अणे व पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी अनिल तायवाडे, मनोज उसरटे, चालक किशोर पंड्या, मुख्यालयातील पोलीस कर्मचारी सुहास शेंडे व गौरव सिडाम यांचे पथक आरोपींना अटक करण्यासाठी जबलपूरकडे रवाना झाले होते. या दोन्ही आरोपींनी मुख्य आरोपी सुदीप सोनी याच्या सूचनेनुसार अमरावतीच्या दोन बँकांमध्ये बनावट दस्तऐवज देऊन खाते उघडले. बँकेचे एटीएम काढून ते एटीएम सोनी यांच्या स्वाधीन केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. गोल्डी या आरोपींने युनियन बँकेत राकेश प्रकाश जैन या नावाने खाते उघडले असून कॅनरा बँकेत दिनेश सूरजमल तिवारी या नावाने खाते उघडले होते.

Web Title: Two more arrested for cheating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.