आणखी दोन अटकेत; तीन अद्यापही पसार
By admin | Published: January 16, 2017 12:12 AM2017-01-16T00:12:38+5:302017-01-16T00:12:38+5:30
मंगळवारी महामार्गानजीक एका ढाब्यावर मोझरीच्या महेन्द्र ठाकूर याची हत्या करण्यात आली.
महेन्द्र ठाकूर हत्या प्रकरण : मोझरी येथे शनिवारी अंत्यसंस्कार
तिवसा : मंगळवारी महामार्गानजीक एका ढाब्यावर मोझरीच्या महेन्द्र ठाकूर याची हत्या करण्यात आली. याप्रकरणी घटनेच्या दिवशी तीन आरोपींना अटक करण्यात आली. पसार झालेल्यांपैकी आणखी दोघांना १४ रोजी रात्री अटक केली असून यामुळे अटकेतील आरोपींची संख्या पाचवर पोहोचली आहे. मात्र अद्यापही ३ आरोपी पसार आहेत. दरम्यान आरोपीं पैकी सोनू लांडगे (२९) व राजेन्द्र बावने (१९, रा.दोघेही तिवसा) यांना अटक करण्यात आली आहे.
जुन्या वादातून शिवसेना शहराध्यक्ष अमोल पाटील याने तिवसा येथील दिवटे गैंगचा समर्थक संदीप ढोबाळे याची हत्या करण्याच्या हेतुने हा कट रचला होता. परंतु फियार्दी संदीप व त्याचा मित्र मोझरीचा महेन्द्र ठाकूर हे घटनेच्या दिवशी सोबत होते. यातच महेंद्र ठाकूरची हत्या झाली. हत्येची कबुली आरोपींनी चौकशीअंती दिली. शनिवारी मोझरीत महेन्द्र ठाकूरवर अंत्यसंस्कार पार पडले. या प्रकरणात उलगळा येऊ शकतो काही दिवसांपूर्वी आरोपी अमोल पाटील याने संदीप ढोबाळे याची करण्याचे हेतुने मोर्शी व नांदगाव पेट च्या काही गुंडाना संदीप ची सुपारी दिली होती.काही गुंडानी तिवसा रेकी करुण संदीप च्या हत्येचा डाव साधला होता मात्र संदीप चे सुद्धा गुन्हेगारा सोबत समंद असल्याने त्यांनी संदीप ची सुपारी होती मात्र या सर्व घटनेशी महेन्द चा काही समंद नस्तानी महेन्द ची हत्या करण्यात आली या मुळे मूर्तक महेन्द चे समर्थक आक्रमक आहे. हे प्रकरण आणखी वाढणार असून हे आरोपी कारागृहात गेल्यावर सुद्धा अनुचित प्रकार घडू शकतो आता 'खून का बदला खून' असे सुर दोन्ही गटा कडून निघत असून आहे या घटनेचा तपास तिवसा पोलिस करीत असून तपासा अंती काय निष्पंन्न होइल हे पाहन ओतुक्याचे ठरेल
रविवार अटकेतील आरोपींचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. पाच आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)