आणखी 'कोरकू' जमातीचे दोघांचे प्रमाणपत्र रद्द अन्‌ जप्त!

By गणेश वासनिक | Published: June 7, 2024 02:27 PM2024-06-07T14:27:48+5:302024-06-07T15:10:11+5:30

Amravati : अमरावती ट्रायबल समितीने दिले आदेश; कलम १०, ११ नुसार कारवाईचे निर्देश

Two more 'Korku' tribe's certificates canceled and confiscated! | आणखी 'कोरकू' जमातीचे दोघांचे प्रमाणपत्र रद्द अन्‌ जप्त!

Two more 'Korku' tribe's certificates canceled and confiscated!

अमरावती : 'लोहार' जात असणाऱ्या परंतू 'कोरकू' जमातीचे प्रमाणपत्र मिळविणा-या आणखी दोघांचे अमरावती येथील जमाती प्रमाणपत्र अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने २४ मे २०२४ रोजी रद्द करुन जप्त केले आहे.

‘लोकमत’ने नुकतेच अंगणवाडी सुपरवायझर साधना हातू धोटे यांचा 'कोरकू' जमातीचा दावा अवैध ठरविल्याचे प्रकरण उघडकीस आणले होते. आता त्यांचे सख्खे भाऊ पोलिस शिपाई राम हातू धोटे आणि भाची डिंपल शाम धोटे यांचाही 'कोरकू' जमातीचा दावा अवैध ठरला आहे.

पोलिस शिपाई राम हातू धोटे यांनी कार्यकारी दंडाधिकारी धारणी यांचेकडून एमआरसी-८१/धारणी/९१-९२ दि. २७ जुलै १९९२ रोजी 'कोरकू' जमातीचे तसेच उपविभागीय अधिकारी,धारणी यांचेकडून एमआरसी -४००१२०५८३३९ दि.१७ आँक्टोबर २०२२ रोजी पुन्हा दुसरे 'कोरकू' जमातीचे प्रमाणपत्र मिळविले. आणि पोलिस उपअधीक्षक (गृह), पोलिस अधीक्षक अमरावती ग्रामीण या कार्यालयामार्फत समितीकडे दावा तपासणीसाठी प्रस्ताव सादर केला. तर त्यांची पुतणी डिंपल शाम धोटे हिने उपविभागीय अधिकारी धारणी यांचेकडून एमआरसी- ४००१२०१४०६१ दि.१० सप्टेंबर २०२० रोजी 'कोरकू' जमातीचे प्रमाणपत्र मिळविले आणि प्राचार्य, नागार्जून इन्स्टिट्यूट आँफ इंजिनिअरिंग टेक्नोलॉजी अँड मँनेजमेंट सातनवरी गाव, अमरावती रोड नागपूर यांचे कार्यालयामार्फत दावा तपासणीसाठी समितीकडे प्रस्ताव सादर केला होता, हे विशेष.

आदिवासी समाजाच्या नोकरी, शिक्षण यामधील आरक्षित जागा बनावट जातप्रमाणपत्राच्या आधारे मोठ्या प्रमाणात चोरीला गेल्या आहे. याला पायबंद घालण्यासाठी शासनाने जातपडताळणी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करुन फौजदारी गुन्हे दाखल करावे .
-दिनेश टेकाम जिल्हाध्यक्ष, ट्रायबल फोरम अमरावती.

Web Title: Two more 'Korku' tribe's certificates canceled and confiscated!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.