अचलपूर तालुक्यात दोन नवे खासगी कोविड रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:12 AM2021-05-24T04:12:06+5:302021-05-24T04:12:06+5:30
फोटो पी २३ कोविड सेंटर परतवाडा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, वाढती रुग्णसंख्या व उपचाराकरिता रुग्णांची होणारी धावपळ ...
फोटो पी २३ कोविड सेंटर
परतवाडा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, वाढती रुग्णसंख्या व उपचाराकरिता रुग्णांची होणारी धावपळ बघता, नागपूर आणि अमरावतीच्या धर्तीवर अद्ययावत असे सुसज्ज दोन खासगी कोविड रुग्णालय साकारण्यात आले आहेत. त्यामुळे तालुक्यात खासगी कोविड रुग्णालयांची संख्या तीन झाली आहे. यात सरकारी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमधील ७० बेड वगळता नव्याने १५० बेड खासगीत उपलब्ध झाले आहेत.
एक अंजनगाव रोडवर सपन हनुमान मंदिरासमोरील जीएम लॉनमध्ये, दुसरे खासगी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, अचलपूर रोडवरील गुलाबबागमध्ये अस्तित्वात आले आहे. याव्यतिरिक्त स्थानिक शासकीय आरोग्य यंत्रणेकडून आंबेडकर वसतिगृहात ३० ऑक्सिजन बेडचा प्रस्ताव जिल्हा यंत्रणेकडे पाठविण्यात आला असून, तो प्रस्ताव प्रलंबित आहे. सोबतच शहरातील कल्याण मंडपममध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. यात नव्याने परत ५० बेड उपलब्ध झाले आहेत.