५० मायक्रॉनखालील दोन क्विंटल प्लास्टिक पन्नी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 11:23 PM2019-12-24T23:23:29+5:302019-12-24T23:23:50+5:30
महापालिका आयुक्त संजय निपाणे व वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या आदेशानुसार मंगळवारी बडनेरा झोन क्रमांक २ व झोन क्रमांक ४ यांनी संयुक्तरित्या प्रभाग क्रमांक २२ अंतर्गत आस्थापनांची तपासणी केली. त्यावेळी सिंधी कॅम्प येथील सुशिल मोटवानी यांच्या राहते घरात असणाऱ्या मोठ्या गोदामात ५० मायक्रॉनच्या आतील प्लास्टिक पन्नी आढळून आली. याशिवाय प्लास्टिक डबे, स्ट्रा, काड्या, हेण्डेल पन्नी असा एकूण दोन क्विंटल माल आढळून आला.
दोन प्रतिष्ठांनावर कारवाई : १५ हजारांचा दंड ठोठावला
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : बडनेरा नवीवस्तीच्या सिंधी कॅम्प येथील सुशील मोटवानी यांच्या घरातील गोदामातून महापालिकेच्या चमूने मंगळवारी ५० मायक्रॉनखालील प्लास्टिक पन्नीचा दोन क्विंटल मुद्देमाल जप्त केला. महापालिकेने सुशील मोटवानी याला दहा हजारांचा दंड ठोठावला तसेच आणखी एका कारवाईदरम्यान दुल्हन नॉव्हेल्टीला पाच हजारांचा दंड दिला आहे.
महापालिका आयुक्त संजय निपाणे व वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या आदेशानुसार मंगळवारी बडनेरा झोन क्रमांक २ व झोन क्रमांक ४ यांनी संयुक्तरित्या प्रभाग क्रमांक २२ अंतर्गत आस्थापनांची तपासणी केली. त्यावेळी सिंधी कॅम्प येथील सुशिल मोटवानी यांच्या राहते घरात असणाऱ्या मोठ्या गोदामात ५० मायक्रॉनच्या आतील प्लास्टिक पन्नी आढळून आली. याशिवाय प्लास्टिक डबे, स्ट्रा, काड्या, हेण्डेल पन्नी असा एकूण दोन क्विंटल माल आढळून आला. महापालिका चमुने तो मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे पन्नी व्यावसायिकांसह पन्नी वापरणाऱ्यांची धाबे दणाणले आहे. महापालिकेने सुशील मोटवानी व दुल्हानी नॉव्हेल्टी यांना दंड ठोठावला. ही कारवाई स्वास्थ्य निरीक्षक बुरे, एकनाथ कुलकर्णी, टांक, माहुलकर, पळसकर, सतीश राठोड, मिथून ऊसरे, जय उसरे, चावरे, प्राधिकृत अधिकारी गणेश अनासने, सुधीर तिवारी, शेंडे यांनी केला. पोलीस निरीक्षक शरद कुळकर्णी यांच्या पथकाने सुरक्षा प्रदान केली.
इतवारा बाजारातून
माल पोहोचला बडनेऱ्यात
प्लास्टिक पन्नीचा हा माल इतवारा बाजारातील मारुती ट्रान्सपोर्टमध्ये सोमवारी आला होता. तेथे महापालिकेच्या चमुने धाड टाकली होती. तत्पूर्वीच तो माल तेथून बडनेरा हलविण्यात आला. त्यामुळे महापालिकेच्या चमूने मंगळवारी बडनेरात धाडसत्र राबविले.