दोन रुपये फी, एका चिठ्ठीवर व्हायच्या निवडणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:14 AM2021-09-11T04:14:21+5:302021-09-11T04:14:21+5:30

मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे : एक चिट्ठी गावात पाठविली की, सर्वच सदस्य आलेल्या निरोपाप्रमाणे मतदान करायचे. दोन रुपयात ...

Two rupee fee, elections to be held on one ballot | दोन रुपये फी, एका चिठ्ठीवर व्हायच्या निवडणुका

दोन रुपये फी, एका चिठ्ठीवर व्हायच्या निवडणुका

Next

मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे : एक चिट्ठी गावात पाठविली की, सर्वच सदस्य आलेल्या निरोपाप्रमाणे मतदान करायचे. दोन रुपयात ही निवडणूक पार पडायची. कोणता उमेदवार निवडून आला, हे तब्बल आठ ते दहा दिवसांनी माहिती व्हायची. त्या काळात दोन तालुक्यात ७३ सेवा सहकारी संस्था होत्या.

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत नामांकन दाखल झाल्यानंतर एका-एका मतासाठी उमेदवारांनी लॉबिंग सुरू केली आहे. वेळप्रसंगी काही उमेदवार किंमत मोजतात. मात्र, पाच दशकापूर्वी पैशापेक्षा उमेदवारांच्या शब्दाला अधिक किंमत राहत असत. त्यावेळच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील चिंचोली, झाडगाव, तळणी, नायगाव दिघी महल्ले या गावाचा सहकार क्षेत्रात डंका अख्ख्या जिल्ह्यात वाजवत होता.

पहिले संचालक माजी आमदार भाऊसाहेब जाधव

चांदूर रेल्वे मतदारसंघाचे दहा वर्षे आमदार राहिलेले भाऊसाहेब जाधव हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पहिले संचालक होते. त्यांचा कार्यकाळ २५ वर्षापर्यंत होता. या बँकेच्या अध्यक्षपदाचा कारभार त्यांनी १० वर्षे सांभाळला. सेवा सहकारी संस्थांना नियमित कर्जवाटप त्यांच्या काळात होत होता. चिंचोली ही सर्वाधिक मोठी सेवा सहकारी संस्था म्हणून ओळखली जाते. भाऊसाहेब जाधव हे महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक प्रतिनिधी म्हणून अनेक वर्षे होते. नंतर बाबासाहेब कडू हे चांदूर, धामणगाव तालुक्यातून निवडून आले होते. भूदान चळवळीत शेकडो जमीन देणारे झाडगावचे फत्तेसिंग मोरे, यशवंतराव सराड, नायगावचे बाळासाहेब शिसोदे, नायगावकर, दिघी महल्ले येथील गजानन महल्ले हे सहकार क्षेत्रात सक्रिय होते.

विजय भैसे यांच्या काळात दोनशे शेतकऱ्यांना विहिरी, पशुपालकांना कर्ज

धामणगाव चांदूर तालुक्यातील ७३ सेवा सहकारी संस्थांनी खऱ्या अर्थाने सण १९९० च्या काळात अधिक गती आली. विजय भैसे हे संचालक झाल्यानंतर त्यांनी सेवा सहकारी संस्थेच्या कर्ज मर्यादित वाढ केली. त्यांनी बँक व सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून दोनशे शेतकऱ्यांना सिंचन विहिरी दिल्या. जलसिंचन क्रांती या दोन्ही तालुक्यात घडली होती. विहीर मिळाली असली तरी कृषिपंपासाठी वीजपुरवठा गरजेचा होता. त्यामुळे त्यांनी राज्य शासनाकडून वीज कनेक्शनचा प्रस्ताव मंजूर करून घेतला होता. पशुपालकांसाठी कर्ज सेवा सहकारी संस्थेमार्फत त्यावेळी देण्यात आली.

आता दोन हजार रुपये शुल्क

पाच दशकापूर्वी अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका केवळ दोन रुपये फी नामांकन भरल्याने होत असे आता तब्बल दोन हजार रुपये नामांकन फी भरावी लागत आहे. त्याकाळी सेवा सहकारी संस्थेच्या सर्व संचालकांना या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार होता. धामणगाव तालुक्यात भाऊसाहेब जाधव, बाबासाहेब कडू, विजयराव भैसे ,तर कधीही बँकेच्या फोनचे वापर न करणारे व शेतकऱ्यांना न्याय देणारे विलास जाधव,भारतसिंह यादव सुरेश महल्ले हे संचालक झाले आहे.

Web Title: Two rupee fee, elections to be held on one ballot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.