कार उलटल्याने दोन गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 08:11 PM2019-05-04T20:11:22+5:302019-05-04T20:11:37+5:30
वाहनचालकाचे संतुलन बिघडल्याने कार मुख्य रस्ता सोडून अमरावती मार्गाकडून डाव्या बाजूला हवेत पाच फुटांपर्यंत उसळली.
तिवसा (अमरावती) : अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कृष्णाजी पेट्रोल पंपाजवळ शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता सुसाट चारचाकी कार उलटून १०० फुटांपर्यंत घासत जाऊन रस्त्याच्या कडेला आदळली. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच ४९ एएस ८९१२ या क्रमांकाची कार नागपूरवरून अमरावतीच्या दिशेने जात होती. वाहनचालकाचे संतुलन बिघडल्याने कार मुख्य रस्ता सोडून अमरावती मार्गाकडून डाव्या बाजूला हवेत पाच फुटांपर्यंत उसळली. वाहनातील दोघांना गंभीर इजा झाली आहे. त्यांना तातडीने १०८ रुग्णवाहिकेतून अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले.
दोघांचे नाव स्पष्ट होऊ शकले नसले तरी वाहनात आधार कार्ड, वाहन परवाना तसेच नागपूर एसटी बसची कागदपत्रे मिळून आली. त्यात सुनील महादेव पराते (रा. ताजनगर, मानेवाडा रोड, नागपूर) या नावाचे आधार कार्ड सापडले. एका गंभीर जखमीचे नाव बंटी कळपे असल्याची माहिती आहे.