चाकू विक्री करणाऱ्या विद्यार्थ्यासह दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 11:30 PM2019-07-17T23:30:13+5:302019-07-17T23:30:28+5:30
अभियांत्रिकीचा एक विद्यार्थी पैशांची गरज भागविण्यासाठी साथीदारासह चक्क चाकू विकत असल्याचे आढळून आले. फ्रेजरपुरा पोलिसांनी विद्यार्थी यश सुरेश चव्हाण (१९, रा. जय श्रीरामनगर, कांडली रोड, परतवाडा) व स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा प्रवीण सुंदरलाल चव्हाण (२८, रा. दाढीपेढी, ता. भातकुली) या दोघांना बुधवारी दुपारी मालटेकडीमागील परिसरातून अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अभियांत्रिकीचा एक विद्यार्थी पैशांची गरज भागविण्यासाठी साथीदारासह चक्क चाकू विकत असल्याचे आढळून आले. फ्रेजरपुरा पोलिसांनी विद्यार्थी यश सुरेश चव्हाण (१९, रा. जय श्रीरामनगर, कांडली रोड, परतवाडा) व स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा प्रवीण सुंदरलाल चव्हाण (२८, रा. दाढीपेढी, ता. भातकुली) या दोघांना बुधवारी दुपारी मालटेकडीमागील परिसरातून अटक केली.
शहरात काही दिवसांपूर्वीच एका तरुणीची चाकूने निर्घृण हत्या करण्यात आली. प्राणघातक हल्ल्याच्याही काही घटना पुढे आल्या. त्या अनुषंगाने पोलिसांनी धारदार शस्त्र बाळगणाºया तरुणांची धरपकड सुरू केली आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी सर्व ठाणेदारांना सूचना देऊन आपल्या हद्दीत शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे निर्देश दिले. दरम्यान फ्रेजरपुरा पोलिसांना बुधवारी कारवाई केली. पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके व पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अयूब हिराजी शेख, एएसआय प्रकाश राठोड, पोलीस शिपाई शेखर गायकवाड, चालक दिनेश जवंजाळ यांनी मालटेकडीमागील परिसरात सापळा रचला. वसंत हॉलच्या बाजूच्या दोन तरुण संशयास्पद स्थितीत आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली. यशजवळ तीन चाकू, तर प्रवीणजवळ दोन मोठे चाकू आढळले. पोलिसांनी त्यांच्याजवळील पाच चाकूसह एमएच ३७ आर ०८५४ क्रमांकाची दुचाकी असा एकूण २२ हजारांचा मुद्देमाल जप्त केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून, त्याच्याविरुद्ध कलम ४, २५ शस्त्र अधिनियम, १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा नोंदविला.
यश हा वाशिम येथे अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाला आहे. तो तेथे एका वसतिगृहात राहतो.