अचलपूरमध्ये दोन हजार ऑटोरिक्षा ‘लॉकडाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 05:00 AM2020-05-22T05:00:00+5:302020-05-22T05:01:16+5:30

लॉकडाऊनमध्ये असलेल्या दोन हजारांहून अधिक ऑटोरिक्षांमध्ये एकट्या अचलपूर शहरातील १ हजार ३०० ऑटोरिक्षा आहेत. परतवाडा शहरात ७०० ते ८०० ऑटोरिक्षा आहेत. यातील हे ऑटोरिक्षा अचलपूरमधील देवडी, चावल मंडी, गांधी पुलावरून, तर परतवाड्यातील ऑटोरिक्षा बस स्टँड, गुजरी, दुरानी चौक, चिखलदरा बस स्टॉप, टिळक चौक, लाकूडबाजार, जयस्तंभ, कॉटन मार्केट, विदर्भ मिल, अचलपूर नाका परिसरातून ये-जा करीत असतात.

Two thousand autorickshaws 'locked down' in Achalpur | अचलपूरमध्ये दोन हजार ऑटोरिक्षा ‘लॉकडाऊन’

अचलपूरमध्ये दोन हजार ऑटोरिक्षा ‘लॉकडाऊन’

Next
ठळक मुद्देरोजीरोटी बुडाली : आर्थिक चणचण, चालक त्रस्त; प्रवासी मिळवून देणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूरमध्ये दोन हजारांहून अधिक ऑटोरिक्षांची चाके लॉकडाऊनमध्ये थांबली आहेत. यात ऑटोरिक्षाचालकांची रोजीरोटी बुडाली असून, त्यांचे कुटुंब आर्थिक चणचणीत भरडले जात आहे. उपासमारीची शक्यता निर्माण झाली आहे.
अचलपूर-परतवाडा या जुळ्या नगरीसह लगतच्या मल्हारा, गौरखेडा, धोतरखेडा, एकलासपूर, धामणगाव गढी, देवगाव, हरम, भिलोना, नारायणपूर, जवर्डी, तोंडगाव, बेलखेडा, म्हसोना परिसरातील कुटुंबांना दोन हजारांवर ऑटोरिक्षा लाइफ लाइन ठरले आहेत. पण, लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद आहेत. उद्योगधंदे, छोटे-मोठे व्यवसाय बंद आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद आहेत. एसटी महामंडळाच्या सार्वजनिक वाहतुकीसह अन्य खासगी वाहतूक बंद आहे. शाळा, महाविद्यालयेही बंद आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने घरीच थांबण्याची सक्ती प्रवासी व पर्यायाने ऑटोरिक्षाचालकांवर आली आहे. ऑटोरिक्षा रस्त्यावर आलाच, तर प्रवासी उपलब्ध नाहीत. त्यामुळे कमिशनवर प्रवासी बसवणाऱ्यांचा रोजगार बुडाला आहे. आर्थिक संकटांचा सामना त्यांना करावा लागत आहे. दोन वेळच्या जेवणाची चिंता त्यांना लागली आहे.
लॉकडाऊनमध्ये असलेल्या दोन हजारांहून अधिक ऑटोरिक्षांमध्ये एकट्या अचलपूर शहरातील १ हजार ३०० ऑटोरिक्षा आहेत. परतवाडा शहरात ७०० ते ८०० ऑटोरिक्षा आहेत. यातील हे ऑटोरिक्षा अचलपूरमधील देवडी, चावल मंडी, गांधी पुलावरून, तर परतवाड्यातील ऑटोरिक्षा बस स्टँड, गुजरी, दुरानी चौक, चिखलदरा बस स्टॉप, टिळक चौक, लाकूडबाजार, जयस्तंभ, कॉटन मार्केट, विदर्भ मिल, अचलपूर नाका परिसरातून ये-जा करीत असतात. पण, लॉकडाऊन मोठ्या मुश्किलीने एखादा ऑटोरिक्षा दिवसातून चौकात, रस्त्याने दिसतो, तोही प्रवाशांविना.
लॉकडाऊन हटल्यानंतरही जोपर्यंत सर्वच यंत्रणा सुरळीत होत नाही, लोकांची ये-जा वाढत नाही तोपर्यंत या ऑटोरिक्षाचालकांच्या रोजीरोटीचे खरे नाही. त्यांच्या रोजीरोटीबाबत अनिश्चितता आहे. अशात या अ‍ॅटोचालकांच्या दोन हजार कुटुंबांतील दहा हजार लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. शासन-प्रशासनाकडून या लोकांनाही मदतीची अपेक्षा आहे.

पुसल्यातील चालकांवर उपासमारीची वेळ
पुसला : देशात लॉकडाऊन लागल्यापासून हाताला काम नसल्यामुळे पुसला येथील ऑटोरिक्षाचालकांवर उपासमाराची वेळ ओढवली आहे. त्यामुळे ऑटोरिक्षाचालक-मालकांना शासनाने आर्थिक मदत देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन आ. देवेंद्र भुयार व प्रशासनाकडे देण्यात आले. यावेळी प्रकाश गजभिये, शफीक बबलू शेख, सुनिल पाटील, महम्मद शकील आदी उपस्थित होते.

मृत्यू दुर्दैवी
ऑटोरिक्षामध्ये कमिशनवर प्रवासी बसवणाºया राजेश माहोरे यांची रोजगाराअभावी आर्थिक विवंचनेने प्रकृती खालावली अन् त्यातच त्यांचा मृत्यू झाला. चिखलदरा स्टॉपवर ते १० रुपये प्रतिवाहन दराने प्रवासी उपलब्ध करायचे. दिवसाकाठी ३०० ते ४०० रुपये त्यांना मिळायचे. पण, लॉकडाऊनमध्ये वाहनांची चाके थांबली.

अचलपूरमध्ये दोन हजारांहून अधिक ऑटोरिक्षा आहेत. यात अचलपूर शहरातून १ हजार ३००, तर परतवाड्यातून ७०० ते ८०० ऑटोरिक्षा जवळच्या खेडेगावापर्यंत प्रवाशांची ने-आण करतात. लॉकडाऊनमुळे ही लाइफ लाइन ठप्प पडली आहे. चालकांसह प्रवासी मिळवून देणाºयांचाही रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगार बुडाल्यामुळे आर्थिक संकटाचा सामना सर्वांना करावा लागत आहे.
- अब्दुल मलीक, अध्यक्ष, विदर्भ प्रदेश, राष्ट्रीय ऑटोरिक्षा युनियन.

Web Title: Two thousand autorickshaws 'locked down' in Achalpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.