गरजूंसाठी बांधून दिली दोन शौचालये

By admin | Published: March 22, 2017 12:13 AM2017-03-22T00:13:43+5:302017-03-22T00:13:43+5:30

यशस्वी वैद्यकीय व्यवसायी असतानाच येथील हृदयरोगतज्ज्ञ मनोज निचत यांनी त्यांचे जन्मगाव असलेले अंजनगाव बारी येथे गरजुसांठी दोन शौचालयांचे बांधकाम करून दिले.

Two toilets built for the needy | गरजूंसाठी बांधून दिली दोन शौचालये

गरजूंसाठी बांधून दिली दोन शौचालये

Next

निचत कुटुंबाचा पुढाकार : जिल्हधिकाऱ्यांची भेट, सामाजिक उपक्रम
अमरावती : यशस्वी वैद्यकीय व्यवसायी असतानाच येथील हृदयरोगतज्ज्ञ मनोज निचत यांनी त्यांचे जन्मगाव असलेले अंजनगाव बारी येथे गरजुसांठी दोन शौचालयांचे बांधकाम करून दिले. आपल्या मूळ गावाचे आपण काही तरी देणे लागतो, ही भावना ठेवून ऋणातून उतराई होण्याकरिता त्यांनी समाजभान ठेवत हे कार्य केले. शिवाय हागणदारीमुक्तीच्या मोहिमेत सहभागी होऊन सामाजिक जबाबदारीही पार पाडली. सोमवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या हस्ते ही दोन्ही शौचालये हस्तांतरित करण्यात आलीत. येथील दिव्यांग नागरिक रतन सुरजुसे व विधवा वच्छला खडसे यांना हे शौचालय हस्तांतरित करण्यात आले आहे.
हृदयरोगतज्ज्ञ मनोज निचत नेहमीच विविध सामाजिक कार्यात सहभाग नोंदवित असतात. शासनाने शंभर टक्के गावे हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. याअनुषंगानेच निचत कुटुंबाने येथील दोन गरजुंना स्वखर्चाने शौचालये उभारून दिली आणि समाजापुढे एक आदर्श ठेवला.
यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. गावातील शेतीच्या सिंचनाची याकरिता शेततळे व विहिरींच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर तहसीलदार बगळे, हद्यरोगतज्ज्ञ मनोज निचत, अंजनगावबारी येथील सरपंच मंदा कळंबे, उपसरपंच लक्ष्मण कदम पंचायत समिती सदस्य मीनल डकरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज निचत यांनी केले. संचालन नीलेश दातीर यांनी, तर आभार वसंत सोनार यांनी मानले. गावातील चार गरीब व गरजू कुटुबीयांना शौचालय बाधूंन देण्याचा यानंतरही आपाला संकल्प असल्याचे मत मनोज निचत यांनी व्यक्त केले. ( प्रतिनिधी)

Web Title: Two toilets built for the needy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.