जनावरांचे अवैध वाहतूक करणारे दोन ट्रक पकडले
By admin | Published: May 28, 2017 12:13 AM2017-05-28T00:13:08+5:302017-05-28T00:13:08+5:30
मागील दोन दिवसापासून नागपूर-औरंगाबाद मार्गाने अवैद्यरित्या जनावरांची वाहतूक सुरू असल्याची
भाजयुमो कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना यश: मंगरूळ पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे / भातकुली रेणुकापूर : मागील दोन दिवसापासून नागपूर-औरंगाबाद मार्गाने अवैद्यरित्या जनावरांची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच शनिवारी भाजयुमोचे कार्यकर्ते व पोलीस पाटलांनी जनावरांनी भरलेले दोन ट्रक मंगरूळ दस्तगीर पोलिसांच्या स्वाधीन केले़
प्राप्त माहितीनुसार ट्रक क्रमांक एमएच १७ बीडी ६६७८, एम एच ०४ सीपी ८१९३ या दोन ट्रकमध्ये १७ बैल व १७ गायी असे एकूण ३४ जनावर कोंबून नेत असल्याची महिती ठाणेदार अमित वानखडे यांनी दिली़ या प्रकरणी चालक शेख जमील शेख कय्युम (३०, रा़ पिंपळगाव बहिणाई) पवन अमृतकर (३०) धनपाल जांभुळे (३६) दोघेही रा़ नागभीड अब्दुल जाबीर अब्दुल मज्जीद (४२, रा़ नांदगाव खंडेश्वर) सचीन गुरपूडे (३५) विमल माणिक खोब्रागडे (३५, रा़नांदगाव) अशा सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे़