अमरावती शहरातून दोन दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:10 AM2021-06-21T04:10:28+5:302021-06-21T04:10:28+5:30

------------------------------------------------------------------------------ अमरावती : शहरातील विविध ठिकाणांवरून दोन जणांच्या दुचाकी चोरट्यानी लंपास केल्या. ही घटना शनिवारी उघडकीस आली. फ्रेजरपुरा हद्दीतील ...

Two two-wheeler lamps from Amravati city | अमरावती शहरातून दोन दुचाकी लंपास

अमरावती शहरातून दोन दुचाकी लंपास

Next

------------------------------------------------------------------------------

अमरावती : शहरातील विविध ठिकाणांवरून दोन जणांच्या दुचाकी चोरट्यानी लंपास केल्या. ही घटना शनिवारी उघडकीस आली. फ्रेजरपुरा हद्दीतील उत्तमनगरातील रहिवासी व्यक्तीच्या घरासमोरून चोरांनी दुचाकी लंपास केली. नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीतून तौसिफ अहमद सईजोद्दीन (३२, रा. वाहेदनगर) यांची दुचाकीचोराने लंपास केली. या दोन्ही घटनांच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा व नागपुरी गेट पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला.

---------------------------------------------------

ट्रकमधील चपलांचा माल लंपास

अमरावती : उभ्या ट्रकमधील ३९ हजार ६७६ रुपयांचा चपलांचा मुद्देमाल चोराने लंपास केला. ही घटना शनिवारी रहमतनगर गल्ली क्रमांक २ मध्ये उघडकीस आली.

शेख बशीर शेख अजीम (४६, रा. रहेमतनगर) यांनी घरासमोर ट्रक उभा केला. त्यानंतर आराम करायला घरात गेले. त्यांचा मोठा भाऊ शेख रऊफ शेख अजीम यांनी ट्रकच्या मालाला दोरीने बांधले होते. परंतु, काही वेळाने ट्रकमधील चप्पलांचा माल चोराने लंपास केल्याचे आढळून आले. त्यांनी या घटनेची तक्रार नागपुरी गेट ठाण्यात नोंदविली

.---------------------------------------

तीन ऑटोरिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

अमरावती : रस्त्यावरील ऑटोरिक्षा उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याने कोतवाली पोलिसांनी शनिवारी तीन चालकांविरुद्ध गुन्हा नोंदविला. शेख अमीन शेख अता (२७, रा. यास्मिननगर), नाजीम खान अब्दुल रहीम खान (५५ रा. पाकिजा कॉलनी) आणि अरबाज खान हबीब खान (२२, रा. बडनेरा) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

Web Title: Two two-wheeler lamps from Amravati city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.