मोतीनाला पुलाखाली दुचाकी कोसळून दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 10:16 PM2018-09-15T22:16:38+5:302018-09-15T22:17:09+5:30

दुचाकीने जात असताना सेमाडोहनजीकच्या मोती नाल्यात दुचाकी कोसळून दोन शिक्षकांचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी २.३० वाजता हा अपघात घडल्यानंतर बातमी वाऱ्यासारखी पसरली. शोककळा उमटली.

Two wheeler collapsed under a bridge of Motinala, killing two people | मोतीनाला पुलाखाली दुचाकी कोसळून दोघांचा मृत्यू

मोतीनाला पुलाखाली दुचाकी कोसळून दोघांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देदोघेही शिक्षक : चिखलदरा तालुक्यातील सेमाडोहनजीकची घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : दुचाकीने जात असताना सेमाडोहनजीकच्या मोती नाल्यात दुचाकी कोसळून दोन शिक्षकांचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी २.३० वाजता हा अपघात घडल्यानंतर बातमी वाऱ्यासारखी पसरली. शोककळा उमटली.
मधुकर शिवाजी राठोड (३६, रा. पिट्टीगुडा, ता. जिवती, जि. चंद्रपूर) असे मृत शिक्षकाचे नाव असून, ते धामणगाव रेल्वे तालुक्यातील गुंजी येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होते. अनिल मावस्कर (रा. शिरपूर, ता. धारणी) असे दुसºया मृताचे नाव आहे. दोघेही दुचाकी क्रमांक एमएच १७ एक्यू ४७८ ने धारणीकडे जात असताना दुचाकी मोतीनाला पुलावरून २५ फूट खोल कोसळल्याने मधुकर राठोड यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमी अनिल मावस्कर यांना रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील सभागृहात ठेवल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. वृत्त लिहिस्तोवर पोलीस पंचनामा सुरू होता.
चिखलदरा तालुक्यात पूर्वी होते कार्यरत
मृत मधुकर शिवाजी राठोड हे चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम सरोवरखेडा व नोबिता येथे सन २००३ ते २०१६ पर्यंत कार्यरत होते. त्यानंतर त्यांची बदली धामणगाव रेल्वे पंचायत समिती अंतर्गत गुंजी येथील जिल्हा परिषद शाळेत झाली. शनिवारी अनिल मावस्कर यांच्या गावी जात असताना हा अपघात झाल्याची अनिल मावस्कर यांच्या पत्नी शोभा मावसकर यांनी सांगितले. त्या बोपापूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत.

Web Title: Two wheeler collapsed under a bridge of Motinala, killing two people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.