गाडगेनगर उड्डाणपुलाखालून दुचाकी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:13 AM2021-05-08T04:13:07+5:302021-05-08T04:13:07+5:30
अमरावती : गाडगेनगर हद्दीतील उड्डाणपुलाखालून एका इसमाची दुचाकी चोराने गुरुवारी लंपास केली. शहजाद अजहर हुसैन (३३, रा. फ्रेजरपुरा) यांची ...
अमरावती : गाडगेनगर हद्दीतील उड्डाणपुलाखालून एका इसमाची दुचाकी चोराने गुरुवारी लंपास केली. शहजाद अजहर हुसैन (३३, रा. फ्रेजरपुरा) यांची एमएच २७ एयू ०११६ क्रमांकाची ही दुचाकी आहे. गाडगेनगर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.
000000000000000000000000
माधवी विहारात दोन घरफोड्या
अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माधवी विहारात घरफोडीच्या दोन घटना गुरुवारी उघडकीस आल्या. महेश शिवहरी आखरे (२९, रा. सुरळी ले-ऑऊट, माधवीविहार) हे २ मे रोजी घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. ६ मे रोजी त्यांना शेजाऱ्यांनी चोरी झाल्याचे कळविले. चोराने दिवाणातील ६० हजारांची रोकड चोरून नेली. तपोवन येथील दीपजया कॉलनीतील रहिवासी श्यामुवेल पेथरस इंगळे यांच्या घरी चोरी झाल्याचे आढळून आले. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला.
0000000000000000000000000000
पिझ्झा, सँडविच मशीनची चोरी
अमरावती : गाडगेनगर हद्दीतील सहकारनगर स्थित एक व्यापारी प्रतिष्ठान फोडून चोरांनी पिझ्झा, सँडविच मशीनसह होम थिएटर असा ३७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ६ मे रोजी हा प्रकार उघड झाला. सागर बाळासाहेब धरपाड (२७, रा. कुंभारवाडा, वलगाव) यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी दोन अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.
000000000000000000
चिचफैल परिसरात महिलेचा विनयभंग
अमरावती : राजापेठ हद्दीतील चिचफैल परिसरात एका महिलेचा विनयभंग करण्यात आला. दुर्गेश श्रीवास्तव (४०, रा. चिचफैल) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर तो चिचफैल येथील सासऱ्याच्या घराजवळ राहायला आला होता. त्याने महिलेचा पाठलाग करून तिचा विनयभंग केला. या घटनेची तक्रार पीडित महिलेने राजापेठ पोलिसांत नोंदविली.
----------------------------------------
सिंगल बातमी
चोरट्याने वीज मीटर केले लंपास
अमरावती : घराबाहेर लावलेले वीज मीटरच अर्ध्या रात्री चोरट्याने लंपास केल्याची घटना अकबरनगर येथे घडली. वीजपुरवठा अचानक खंडित झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
अकबरनगरातील एका घरातून गुरुवारी चोराने वीज मीटर लंपास केले. शेख मोहम्मद सेख सज्जाद (४०, रा. अकबरनगर) हे कुटुंबीयांसोबत घरी झोपले असता, अचानक वीज पुरवठा बंद झाला. त्यांनी मीटरची पाहणी केली असता, त्यांना मीटर दिसले नाही. त्याची वायरिंगसुद्धा उघडी दिसली. त्यांनी या घटनेची तक्रार नागपुरी गेट पोलिसात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.