गाडगेनगरातून दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:10 AM2021-07-16T04:10:51+5:302021-07-16T04:10:51+5:30

अमरावती : गाडगेनगर हद्दीतील ट्रेड मार्क्स कॉम्पलेक्ससमोरून अंकित मनीष गुप्ता (२५, रा. मसानगंज) या तरुणाची दुचाकी (एमएच २७ बीजे ...

Two-wheeler lampas from Gadagenagar | गाडगेनगरातून दुचाकी लंपास

गाडगेनगरातून दुचाकी लंपास

Next

अमरावती : गाडगेनगर हद्दीतील ट्रेड मार्क्स कॉम्पलेक्ससमोरून अंकित मनीष गुप्ता (२५, रा. मसानगंज) या तरुणाची दुचाकी (एमएच २७ बीजे ९८६९) चोराने लंपास केली. ही घटना बुधवारी उघडकीस आली. काम आटोपून ते परतले असता, त्यांना दुचाकी दिसली नाही. त्यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.

---------------------------------------------

मद्यपी वाहनचालकाविरुद्ध कारवाई

अमरावती : दारूच्या नशेत ट्रक चालविणाऱ्या एका चालकालाविरुद्ध नांदगाव पेठ पोलिसांनी बुधवारी गुन्हा नोंदविला. मधुकर उंदराजी जाधव (४८, रा. अनभोरा, ता. मूर्तिजापूर) असे आरोपीचे नाव आहे. नांदगाव पेठ पोलिसांनी टोलनाक्यावर एमएच ४० - ५३६० क्रमांकाचा अनियंत्रित ट्रक पकडला. चालकाची तपासणी केली असता, तो मद्यपान केलेला असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला.

Web Title: Two-wheeler lampas from Gadagenagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.