दुचाकी मालकांनी केला पोलिसांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:10 AM2021-06-25T04:10:25+5:302021-06-25T04:10:25+5:30
तालुक्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढत असताना चोरांचा सुगावा लागत नसल्याने वाहनधारकांचे पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, चांदूर ...
तालुक्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढत असताना चोरांचा सुगावा लागत नसल्याने वाहनधारकांचे पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, चांदूर बाजार, शिरजगाव कसबा, ब्राह्मणवाडा थडी येथील पोलिसांच्या संयुक्त पथकाने धडक कार्यवाही करीत दुचाकी चोरट्याना जेरबंद केले. या कार्यवाहीत जप्त केलेल्या दुचाक्या मोठ्या प्रमाणात सापडल्याने चांदूर बाजार मधील अनेक नागरिकांचा या चोरी गेलेल्या या दुचाक्या सापडल्याने चांदूर बाजार येथील दुचाकी मालकांनी समाधान व्यक्त केले.
वाढत्या चोरीचा घटनांमुळे नागरिकांमध्ये पोलिसांविषयी गैरसमज पसरलेला होता. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरासह मुद्देमाल जप्त केल्याने पोलिसाविषयी पसरलेला गैरसमज संपुष्टात असल्याचे समाधान दुचाकींचा मूळ मालकांनी व्यक्त केले. चांदूर बाजार पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्यातील दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहे. यात १ मे रोजी चोरी गेलेली संतोष तायडेंसह ३ मे रोजी चोरी गेलेली प्रफुल्ल नावंदर, ६ मे रोजी चोरी गेलेली शुभम लोणारकर यांची चोरी गेलेली दुचाकी आढळून आली.
चांदूर बाजार ठाण्याच्या हद्दीतील चोरी गेलेल्या गाड्या विरुद्ध ठाणेदार सुनील किणगे, ब्राम्हणवाडा थडीचे ठाणेदार दीपक वळवी यांच्या मार्गदर्शनात संजय शिंदे, पोलीस जमादार विनोद इंगळे, प्रशांत भटकर, वीरेंद्र अमृतकर, नितीन डोंगरे, महेश काळे, मोईन मांजरे, दुर्गेश इंदुरकर यांच्या पथकाने कारवाई केली. ताब्यात घेतलेल्या सदर दुचाकीच्या मूळ मालकाकडून ओळख पटविली असून, न्यायालयाच्या आदेशानंतर ही वाहने संबंधिताना देण्यात येणार आहे.
पोलीस स्टेशन चांदूर बाजार येथील दाखल गुन्ह्यातील मोटरसायकली मिळून आल्याने वाहनमालक शुभम संजय लोणारकर, संतोष दशरथ तायडे, प्रफुल्ल रामनारायण नावंदर यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात पोहचून पोलीस अधिकारी, अंमलदारांसह पोलीस विभागाचा सत्कार केला.