दुचाकीचोरी, घरफोडी करणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2022 05:00 AM2022-04-08T05:00:00+5:302022-04-08T05:00:46+5:30

शुभम ऊर्फ चिपलीन बंडू धाकडे (१९, रा. जुनी वस्ती, कांडली, परतवाडा), आनंद विकासराच डायलकर  (२१, बोरगाव दोरी, ता. अचलपूर), शुभम गोपाळराव वैराळे (२४, रा. राजनापूर्णा, ता. चांदुरबाजार) व रितीक चंदू इंगळे (२०, रा. भालसी ता. भातकुली) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. 

Two-wheeler theft, burglary gang arrested | दुचाकीचोरी, घरफोडी करणारी टोळी जेरबंद

दुचाकीचोरी, घरफोडी करणारी टोळी जेरबंद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकीचोरी, घरफोडी करणाऱ्या चार आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, त्यांनी घरफोडीच्या तीन घटनांची कबुली दिली. 
शुभम ऊर्फ चिपलीन बंडू धाकडे (१९, रा. जुनी वस्ती, कांडली, परतवाडा), आनंद विकासराच डायलकर  (२१, बोरगाव दोरी, ता. अचलपूर), शुभम गोपाळराव वैराळे (२४, रा. राजनापूर्णा, ता. चांदुरबाजार) व रितीक चंदू इंगळे (२०, रा. भालसी ता. भातकुली) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. 
 सहायक पोलीस निरीक्षक  रामेश्वर थोडगे व त्यांचे पथकातील अंमलदार हे ५ एप्रिल रोजी अचलपूर उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना माहिती मिळाली की, एका इसमाजवळ चोरीची गाडी असून तो लाखनवाडी येथे विक्री करण्याकरिता लोकांना विचारपूस करीत आहे. त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने स्वत:चे नाव  शुभम ऊर्फ चिपलीन बंडू धाकडे असे सांगितले.  
त्याच्यासह त्याच्या तीन साथीदारांकडून एकूण आठ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. याशिवाय परतवाडा व आसेगाव व कळमेश्वर येथे नोंद असलेल्या गुन्ह्यातील  २ लाख ९५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या  मोटारसायकली आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणावरून चोरल्या. 
रितिक इंगळे रा. भालसी याने शुल्लक किमतीने त्या खरेदी केल्या होत्या व त्या विक्री करण्याकरिता ग्राहकांचा शोध घेत असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ,  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहायक फौजदार मूलचंद भांबूरकर, हवालदार दीपक उईके, युवराज मानमोठे,  मंगेश लकडे,  स्वप्निल तंवर, नितीन कळमकर यांनी कारवाई केली.

 

Web Title: Two-wheeler theft, burglary gang arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर