चांदुर बाजार तालुक्यात दुचाकी चोरांचे रॅकेट उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:09 AM2021-06-19T04:09:49+5:302021-06-19T04:09:49+5:30

फोटो पी १८ चांदूरबाजार चांदूर बाजार ब्राम्हणवाडा थडी : चांदूरबाजार व ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत ...

Two-wheeler thieves racket exposed in Chandur Bazar taluka | चांदुर बाजार तालुक्यात दुचाकी चोरांचे रॅकेट उघड

चांदुर बाजार तालुक्यात दुचाकी चोरांचे रॅकेट उघड

Next

फोटो पी १८ चांदूरबाजार

चांदूर बाजार ब्राम्हणवाडा थडी : चांदूरबाजार व ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत दुचाकी चोरांचे मोठे रॅकेट उघड केले. याप्रकरणी आठ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांचेकडून सुमारे २० लाख ३० हजार रूपये किमतीच्या २९ दुचाकी जप्त करण्यात आल्या.

उज्वल दिलीपराव बोराडे, (२२, रा. सोनोरी, ता. चांदुर बाजार), पवन मनोहर वाहाने (२५, रा. माधान), संकेत किशोर मेश्राम, (२१, रा. पिंपरी, ता. चांदुर बाजार), नौशाद अली रहमान शाह, (२७, शिरजगाव बंड), देवानंद विजय नागापुरे (२८, रा. हैदतपुर वडाळा, ता. चांदुरबाजार) व एजंट अन्सार शहा दिलबर शहा (२७, शिरजगाव बंड, ता. चांदुर बाजार) व सरफराज मन्सुर अली शहा (२४, शिरजगाव बंड) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी सर्वप्रथम उज्वल दिलीपराव बोराडे यास ताब्यात घेतले. त्याबाबत तपासाची चक्रे फिरवुन तिन्ही पोस्टे स्तरावर विविध पथके बनवुन नौशाद अली रहमान शाह हयाने चोरीच्या मोटारसायकल आणखी दोन एजंटला विक्री करण्याकरिता दिल्याबाबत माहीती मिळाली. त्यांनंतर देवानंद नागापुरे व एजंट अन्सार शहा दिलबर शहा यांस ताब्यात घेवुन मोठयाप्रमाणात चोरीच्या दुचाकी जप्त केल्या. चोरी केलेल्या मोटारसायकलच्या डुप्लीकेट आरसी बनविण्याचे काम सरफराज मन्सुर अली शहा याने केल्याचे तपासात उघड झाले. त्याने चोरीच्या वाहनांची डुप्लीकेट आरसी बनवुन ग्राहकांना देत असल्याचे कबुल केले. वरील सर्व आरोपींकडुन विविध कंपनीच्या एकूण २९ दुचाकी किंमत अंदाजे २० लाख ३० रुपयांचा मुददेमाल पोलीसांनी जप्त केला. चांदुरबाजार, ब्राम्हणवाडा थ डी, शिरजगाव कसबा, परतवाडा, मोर्शि, शिरखेड तसेच बडनेरा, अमरावती शहर व यवतमाळ येथील मोटारसायकल चोरीचे मोठ्या प्रमाणात गुन्हे उघड झाले आहेत. चांदूरबाजारचे पोलीस निरीक्षक सुनिल किनगे, एपीआय दिपक वळवी, एपीआय पंकज दाभाडे, एपीआय नरेंद्र पेन्दोर, पीएसआय संजय शिंदे, पीएसआय राजेंद्र टेकाडे, व दादाराव पंधरे यांनी पार पाडली.

कोट

जिल्हयात बनावट आरसी बनवुन जुन्या मोटारसायकल विक्रीचे रॅकेट उघडकीस आले. नागरीकांनी जुन्या गाडया विकत घेतांना कागदपत्रांची जवळच्या पोलीस स्टेशनला पडताळणी करावी.

सुनील किनगे, ठाणेदार, चांदुर बाजार

Web Title: Two-wheeler thieves racket exposed in Chandur Bazar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.