अमरावतीत दोन महिलांना लुटले; अज्ञात मोटारसायकलस्वाराविरूध्द गुन्हा दाखल

By प्रदीप भाकरे | Published: April 16, 2023 02:34 PM2023-04-16T14:34:24+5:302023-04-16T14:34:32+5:30

एक महिला तिच्याकडील जुने वापरते सोने गहान ठेवण्यासाठी मोतीनगर परिसरात गेली होती.

Two women robbed in Amravati; A case has been registered against an unknown motorcyclist | अमरावतीत दोन महिलांना लुटले; अज्ञात मोटारसायकलस्वाराविरूध्द गुन्हा दाखल

अमरावतीत दोन महिलांना लुटले; अज्ञात मोटारसायकलस्वाराविरूध्द गुन्हा दाखल

googlenewsNext

अमरावती: घराकडे पायदळ जात असलेल्या एका महिलेला दुचाकीवर बसवून तिच्याकडील ५२ हजार ५०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटण्यात आला. १५ एप्रिल रोजी दुपारी २.४५ च्या सुमारास कलोतीनगर परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी शनिवारी रात्री ९ च्या सुमारास अज्ञात मोटारसायकलस्वाराविरूध्द गुन्हा दाखल केला.

एक महिला तिच्याकडील जुने वापरते सोने गहान ठेवण्यासाठी मोतीनगर परिसरात गेली होती. मात्र ते दुकान बंद असल्याने त्या महिलेने स्वत:कडील ७ ग्रॅमची व गळयातील १० ग्रॅमची सोन्याची पोत मोबाईलसह पिशवीत ठेवली. ती घराकडे पायदळ जात असताना मागून एक दुचाकीस्वार तिच्याजवळ येऊन थांबला. आपण पापडाचा व्यवसाय करत असून, तुम्ही पापड लाटण्याचे काम कराल का, त्यामोबदल्यात आठ हजार रुपये देईन, अशी बतावणी त्याने केली.

तुम्ही माझ्या सोबत माझ्याघरी चला, पगाराबाबत माझ्या आईशी सविस्तर बोलून घ्या, असेही तो म्हणाला. त्यामुळे पैशाच्या आशेपोटी ती महिला त्या अज्ञाताच्या दुचाकीवर बसली. तो तिला कलोतीनगर परिसरात घेऊन गेला. निर्जन स्थळ पाहून त्याने महिलेकडील सोन्याच्या लहान मोठ्या पोत व मोबाईल असलेली पिशवी हिसकावली. काही क्षणातच तो दुचाकीने रफुचक्कर झाला. तिने आरडाओरड केली. मात्र, भर दुपारची वेळ असल्याने कुणापर्यंत तिचा आवाज पोहोचू शकला नाही. परिणामी, कुणी तिच्या मदतीला धावू शकले नाही. त्यामुळे तिने फ्रेजरपुरा पोलीस ठाणे गाठले.

दुचाकीस्वार आले न हिसकावली पर्स 

शिवाजी कॉलेजच्या भिंतीजवळ उभ्या असलेल्या एका महिलेकडील पर्स जबरदस्तीने हिसकावण्यात आली. १५ एप्रिल रोजी दुपारी १ च्या सुमारास सुपर स्पेशालिटी दवाखान्याकडे जाणाऱ्या मार्गावर हा प्रकार घडला. शैक्षणिक कामासाठी शहरात आलेली ती महिला शनिवारी दुपारी सांस्कृतिक भवनासमोरच्या रस्त्यावर ऑटोची वाट पाहत उभी होती. तेवढ्यात तिला लघुशंका आल्याने ती आडोसा शोधण्यासाठी मोर्शी रोडवरील सुपर स्पेशालिटीकडे जाणाऱ्या मार्गाकडे गेली. तेवढ्यात एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या तिघांनी तिच्याकडील पर्स हिसकावून पळ काढला. त्या पर्समध्ये ८०० रुपयांचा मोबाईल व ७ हजार रुपये रोकड असल्याची तक्रार महिलेने गाडगेनगर पोलिसांत नोंदविली.

Web Title: Two women robbed in Amravati; A case has been registered against an unknown motorcyclist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.