न्यू कॉलनीतील फ्लॅटवरून दोन महिलांना घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:13 AM2021-05-10T04:13:19+5:302021-05-10T04:13:19+5:30
अमरावती : फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील न्यू कॉलनीतील एका फ्लॅटवर रात्री व दुपारी वेगवेगळ्या महिला व काही पुरुषांचा वावर असल्याची ...
अमरावती : फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील न्यू कॉलनीतील एका फ्लॅटवर रात्री व दुपारी वेगवेगळ्या महिला व काही पुरुषांचा वावर असल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली होती. पोलिसांनी फ्लॅटवर धाड टाकून दोन महिलांना ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली होती.
ताब्यात घेतलेल्या महिलांविरुद्ध कलम ११०, १११ अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. मात्र, या ठिकाणी कुंटणखाना वा त्यासासम हालचाली आढळून आल्या नाहीत किंवा कुठला ग्राहकाही आढळून आला नसल्याचे फ्रेजरपुरा पोलिसानी स्पष्ट केले. न्यू कॉलनीतील या फ्लॅटवर काही महिला व बाहेरच्या पुरुषांचा वावर असतो. ते गैरकृत्य करण्याकरिता येथे येतात, अशी तक्रार काही नागरिकांनी फ्रेजरपुरा पोलिसांकडे केली होती. नागरिकांनी केलेल्या कॉलवरून फ्रेजरपुऱ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुंडलीक मेश्राम हे काही महिला कर्मचाऱ्यांसमवेत या ठिकाणी पोहचले. परंतु, येथे कथित पुरुष ग्राहक आढळून आले नाही. महिलांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने दोघींना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये शहरातीलच ३० वर्षीय महिला व परतवाड्याची ४० वर्षीय महिला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करून त्यांना सोडण्यात आले. मात्र, या घटनेची जोरदार चर्चा परिसरात होती.
कुंटणखाना असेल, तर बनावट ग्राहक करून त्या ठिकाणी पाठवावा लागतो. त्याची खातरजमा झाल्यानंतर कारवाई केली जाते, असे पोलिसांनी सांगितले. येथे कुठलाही गैरप्रकार आढळून न आल्याने त्यासंबंधी गुन्हा नोंदविला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.