विद्युत प्रवाहाचा झटका दोन मजूर भाजले
By admin | Published: June 2, 2014 12:51 AM2014-06-02T00:51:14+5:302014-06-02T00:51:14+5:30
विद्युत प्रवाहाचा झटका लागल्याने दोन मजूर गंभीर जखमी झाले.
अमरावती : विद्युत प्रवाहाचा झटका लागल्याने दोन मजूर गंभीर जखमी झाले. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यांतर्गत बिच्छु टेकडी येथील राहुलनगर येथे रविवारी सकाळी १0.४५ वाजता ही घटना घडली. विनोद आत्माराम लोणारे (४0, रा. राहुलनगर) व राजू रमेश बोडे (१८,रा. बिच्छु टेकडी) अशी भाजलेल्या मजुरांची नावे आहेत. राहुलनगर येथील रामदास गुडधे हे सेवानवृत्त पोलीस कर्मचारी आहेत. त्यांच्या घराच्या छतावर रविवारी विनोद व राजू हे वीज फिटिंगचे काम करीत होते. तेथून काही अंतरावरून ६६ के.व्ही च्या हायपरटेंशनच्या तारा गेल्या आहेत. या तारातून अचानक ठिणगी उडून लोखंडाच्या गजांवर पडल्याने तेथे विद्युत प्रवाह संचारला. याचा झटका विनोद व राजू यांना लागला. यामध्ये विनोद हे ५६ टक्ेक व राजू १८ टक्के भाजले. दरम्यान बघ्यांची गर्दी उसळली. परंतु मदतीसाठी कोणीही धावून आले नाही. घटनेची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक पंडित राजपुत, रमेश निंभोरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी पोलिसांची कारवाई सुरु होती. (प्रतिनिधी)