दोन वर्षीय चिमुकला उद्ध्वस्त आईच्या कुशीत शोधत होता आश्रय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 10:07 PM2018-06-02T22:07:25+5:302018-06-02T22:07:43+5:30

होत्याचे नव्हते होणे हे किती क्लेशदायक असते, याचा प्रत्यय शुक्रवारी सायंकाळी बहिरम मार्गावर झालेल्या भीषण अपघातात आला. एकीकडे अपघातात रस्त्यावर पडलेला पतीचा आणि पोटचा गोळा असलेल्या चार वर्षीय चिमुकलीच्या मृतदेहाकडे टक लावलेली उद्ध्वस्त आई आणि दुसरीकडे दुचाकीवरून फेकला गेल्याने भेदरून तिच्या कुशीत आश्रय शोधणारा दोन वर्षीय रक्तबंबाळ चिमुकला हे केविलवाणे दृश्य उपस्थित सर्वांच्या डोळ्यात अश्रू आणणारे ठरले.

Two-year-old Chimukla was seeking shelter for the devastated mother | दोन वर्षीय चिमुकला उद्ध्वस्त आईच्या कुशीत शोधत होता आश्रय

दोन वर्षीय चिमुकला उद्ध्वस्त आईच्या कुशीत शोधत होता आश्रय

Next
ठळक मुद्देवडील-मुलीचा करुण अंत, तर मुलगा-आई गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : होत्याचे नव्हते होणे हे किती क्लेशदायक असते, याचा प्रत्यय शुक्रवारी सायंकाळी बहिरम मार्गावर झालेल्या भीषण अपघातात आला. एकीकडे अपघातात रस्त्यावर पडलेला पतीचा आणि पोटचा गोळा असलेल्या चार वर्षीय चिमुकलीच्या मृतदेहाकडे टक लावलेली उद्ध्वस्त आई आणि दुसरीकडे दुचाकीवरून फेकला गेल्याने भेदरून तिच्या कुशीत आश्रय शोधणारा दोन वर्षीय रक्तबंबाळ चिमुकला हे केविलवाणे दृश्य उपस्थित सर्वांच्या डोळ्यात अश्रू आणणारे ठरले.
मध्य प्रदेशच्या उदामा येथून परतवाडा येथे काही खरेदीसाठी आलेल्या बेलसरे कुटुंबाचा परतीच्या प्रवासात काळाने घात केला. दोन दुचाकी समोरासमोर धडकून झालेल्या भीषण अपघातात मुलगी स्वाती आणि वडील सुभाष यांचा करुण अंत झाला, तर चिमुकला अजय आणि आई सुमन गंभीर जखमी झाली. त्याच्या काही क्षणापूर्वीच हसत-बागडत हे कुुटुंब दुचाकीने आपल्या गावाकडे मार्गक्रमण करीत होते. प्रवासातील गमती-जमतींचे एकमेकांशी आदानप्रदान सुरू होते. भावी आयुष्याचे स्वप्नही त्यात होते. यावेळी मात्र पुढे सर्वनाश वाढून ठेवला आहे, याची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती. यमदूत म्हणून विरुद्ध दिशेने भरधाव दुचाकी घेऊन आलेल्या दारूड्याने जोरदार धडक दिली
अपघात एवढा भीषण होता की, आवाजाने आंतरराज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. नजीकच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनाही तात्काळ पाचारण करण्यात आले. परंतु, त्यापूर्वीच सर्व काही संपलं होतं.
अजयने उपस्थितांना रडविले
माय-लेकांना रुग्णालयात नेण्यासाठी उपस्थितांनी अजय जवळ घेण्याचा सर्वप्रकारे प्रयत्न केला. परंतु भेदरलेला अजय आईच्या कुशीत रक्तबंबाळ अवस्थेत आश्रय शोधत होता, तर याच अपघातात गंभीर जखमी सुमन बेलसरे नि:शब्द झाल्या होत्या. गंभीर अजयची आर्त हाकसुद्धा ऐकू न येण्याइतपत सुमनला भान नव्हते. अजयचे आईला बिलगणे पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

Web Title: Two-year-old Chimukla was seeking shelter for the devastated mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.