ट्रॅव्हल्सच्या धडकेत दोन युवक ठार, चिंचखेड फाट्यावरील घटना

By प्रदीप भाकरे | Published: October 18, 2022 10:39 PM2022-10-18T22:39:02+5:302022-10-18T22:39:33+5:30

वरुडकडे भरधाव जाणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या धडकेत दुचाकीस्वार दोन युवक घटनास्थळीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान चिंचखेड फाट्यावर घडली.

Two youths killed in collision with traveller incident at Chinchkhed Phata | ट्रॅव्हल्सच्या धडकेत दोन युवक ठार, चिंचखेड फाट्यावरील घटना

ट्रॅव्हल्सच्या धडकेत दोन युवक ठार, चिंचखेड फाट्यावरील घटना

googlenewsNext

वरुडकडे भरधाव जाणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या धडकेत दुचाकीस्वार दोन युवक घटनास्थळीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान चिंचखेड फाट्यावर घडली. माहुली जहागीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांचेही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. दोन्ही युवकांची ओळख अद्याप पटली नसून ट्रॅव्हल्स चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

ट्रॅव्हल्स क्र.एम.पी.३०,पी.२९५ भरधाव वेगाने प्रवासी घेऊन जात असतांना दोन युवक नवीन दुचाकीने माहुली जहागीरकडे येत असतांना चिंचखेड फाट्यानजीक ट्रॅव्हल्सने दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये दोन्ही युवक घटनास्थळीच ठार झाले. घटनेनंतर बघ्यांची एकच गर्दी उसळली होती. नागरिकांनी माहुली जहागीर पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून पंचनामा केला व दोन्ही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.

माहुली जहागीर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विरुळकर यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसल्याचे सांगितले. ट्रॅव्हल्स च्या चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पुढील तपास माहुली जहागीर पोलीस करीत आहेत.

Web Title: Two youths killed in collision with traveller incident at Chinchkhed Phata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात